रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत पक्षादेश झुगारून लावणाऱ्या सदस्यांचे सदस्यत्व रद्द करावे अशी मागणी करणारा अर्ज आज शेकाप आणि राष्ट्रवादीने जिल्हाधिकाऱ्यांकडे केला असल्याने शेकापच्या दोन आणि राष्ट्रवादीच्या दोन अशा चार सदस्यांचे सदस्यत्व धोक्यात आले आहे.
रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष- उपाध्यक्षांची निवडणूक 21 तारखेला झाली.या निवडणुकीत शेकापने व्हीप बजावल्यानंतरही सदस्या कविता गायकवाड आणि ज्ञानदेव पवार यांनी अध्यक्षपदाचे उमेदवार सुरेश टोकरे आणि उपाध्यक्षपदाचे अरविंद म्हात्रे यांना मतदान केले नव्हते.त्याच प्रमाणे राष्ट्रवादीचे सदस्य महेंद्र दळवी आणि राजीव साबळे यांनीही व्हीप झुगारून लावला होता.त्यामुळे या सदस्यांवर कारवाई करावी अशी मागणी दोन्ही पक्षांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.या अर्जावर जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात याकडं जिल्हयाचं लक्ष वेधलं अ
चौघाचे सदस्यत्व धोक्यात
(Visited 123 time, 1 visit today)