पाकिस्तानातील जियो टेलिव्हिजन नेटवर्कच्या वतीनं चालविण्यात येणाऱ्या तीन वाहिन्यांची लायसन्स रद्द करण्यात आली आहेत..जियो न्यूज,जियो इंटरटेंटमेंट आणि जियो तेज यांचा समावेश आहे.
आयएसआय च्या विरोधात वाहिनीवरून करण्यात आलेल्या आरोपांच्या संरक्षण मंत्राल्यानं केलेेल्या तक्रारीनुसार इलेक्टॉनिक मिडिया नियामक प्राधिकऱण च्या एका समितीने केलेली ही कारवाई तात्काळ अंमलात येईल.या आदेशाबरोबरच वाहिन्यंाची कार्यालयांना सिल कऱण्याचे आदेशही देण्यात आले आङेत.वाचकांना स्मरत असेल की,जियो न्यूजचे वरिष्ठ पत्रकार हामिद मीर यांच्यावर काही दिवसांपूर्वी जिवघेणा हल्ला कऱण्यात आला होता.या हल्ल्यामागे देशातील गुप्तचर यंत्रणा आयएसआय असल्याचे बोलेले जात होते.वाहिनीनेही तसे आरोप केले होते तेव्हा पासूनच नेटवर्कवर कारवाई होण्याची भिती व्यक्त केली जात होती.