पाकिस्तानात माध्यम स्वातंत्र्याची सर्रास होळी पेटविली जात आहे.पत्रकारांवर हल्ले करून त्यांचा जीव घेणे ही नित्याची बाब झाली आहे.त्यातून अपेक्षित हेतू साध्य होत नसल्याने आता माध्यमांचे आवाज बंद कऱण्यासाठी त्यांचे गळे घोटण्याचे काम सुरू झाले आहे.
मध्यंतरी जिओ न्यूज चे पत्रकार हमिद मीर यांचयार जीवघेणा हल्ला झाला होता.त्यातून तो बचावला.हा हल्ला आयएसआय ही पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आणि तिचा प्रमुख लेफ्ठनंट जनरल जहिरूल इस्लाम यांनी घडवून आणल्याचा आरोप ज़िओ न्यूजने केला होता.त्यामुळे आय एस आय आणि जिओ टीव्ही यांच्यात वाद सुरू झाला होता.त्याची परिणती आज जिओ न्यूजचे प्रसारण 15 दिवसासाठी बंद कऱण्यात झाली.मिडिया नियामक प्राधिकऱणाने ही कारवाई केली.जिओ न्यूजला एक कोटी रूपयांचा दंडही थोटावण्यात आला आहे.यामुळे पाकिस्तानातील माध्यमात खळबळ उडाली आहे.
भारतात राहून पाकिस्ताचा पुळका करणारे अनेक पत्रकार मुंबईत आणि आपल्या देशात आहेत.मात्र तेथे सरळ सरळ माध्यमांची मुस्कटदाबी सुरू असतानाही कोणी त्याचा निषेध करायलाही तयार नाही हे विशेष.