पोलिसांच्या त्रासाला कंटाळून काही दिवसांपुर्वी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून जाळून घेतलेले पत्रकार,लाईट ऑफ पुणे साप्ताहिकाचे संपादक रुबेन सॅम्युअल यांचे आज निधन झाले.सॅम्युअल यांच्यावर पोलिसांनी अनेक खोटे गुन्हे दाखल केले होते असा त्यांचा आरोप होता.या त्रासाला कंटाळूनच त्यांनी 28 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर समोर स्वतःला जाळून घेतले होते.जवळपास महिनाभर ते मृत्यूशी झुंज देत होते.आज अखेर त्यांचे निधन झाले-