जयंतभाईं को गुस्सा क्यो आता है ? हे आहे खरं कारण..

0
810

जयंत पाटील शहारूखवर का भडकले ?,बघा खरं कारण काय आहे ते..

भारतीय घटनेनं सर्वांना संचार स्वातंत्र्य दिलंय.त्यामुळं कोणी कोठं जावं,राहावं याला काही बंधनं नाहीत.अलिबाग याला अपवाद असावं.कारण शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी शहारूख खानला ‘माझ्या परवानगी शिवाय तू अलिबागला येऊच शकत नाहीत’ असं दर्डावून आपल्या देशात मर्यादितच संचार स्वातंत्र्य आहे,काही ठिकाणी काही नेत्यांची परवानगी घेऊनच जावं लागतं हे दाखवून दिलंय.

मसला गेट वे ऑफ इंडियावरचा आहे.शहारूखचा अलिबागला बंगला आहे.तो आपला वाढदिवस साजरा करून परत मुंबईला स्पीड बोटीनं आला होता.त्याची बातमी गेट वे वर कळल्यावर तिथं एकच गर्दी उसळली.त्यामुळ पोलिसानी शहारूख फॅन्सला अडवून धरलं.त्यात काळी पॅन्ट आणि हाफ शर्टमध्ये असणार्‍या आमदार जयंत पाटील यानाही रोखलं गेलं.त्यामुळं ते भडकले.तावातावाने खाली आले आणि ‘असशील तू मोठा स्टार ,अलिबाग तू खरेदी केलेलं नाहीस,माझ्या परवानगी शिवाय तू अलिबागला येऊ शकत नाहीस’ असा दम शहारूखला भरला.जयंत पाटील बोटीवरून हावभाव करीत हा दम भरत असताना शहारूख बाहेर देखील आला नाही.तो शांत बसून राहिला.जयंत पाटील आपल्या बोटेतून निघून गेल्यावर शांतपणे बाहेर आला आणि निघून गेला.हा सारा प्रकार घडला त्यात प्रथमदर्शनी शहारूखची काहीच चूक दिसत नाही.कारण तो जेथे जातो तेथे त्याचे फॅन्स गर्दी करतातच.पोलिसही असतात.कौतूक तर शहारूखचं केलं पाहिजे.कारण जयंत पाटील त्याचा ऐकेरी उल्लेख करीत असताना आणि जोरजोरात बोलत असताना तो बाहेरही आला नाही किंवा आमदार महोदयांच्या तोंडीही लागला नाही.

प्रश्‍न असा आहे की,जयंत पाटील एवढे भडकले का ?.स्थानिक वृत्तपत्र रायगड टाइम्सनं आज जे वृत्त दिलं आहे ते बघण्यासारखं  शिवसेनेचे नेते महेंद्र दळवी हे जयंत पाटील यांचे कट्टर विरोधक.मात्र शहारूख खानचे ते मित्र आहेत.शहारूख खान जेव्हा जेव्हा अलिबागला येतात तेव्हा तेव्हा ते महेंद्र दळवी यांना भेटल्याशिवाय जात नाहीत.अलिबाग ही आपली राजकीय जहागीर असताना शहारूख खान आपला प्रतिस्पर्धी महेंद्र दळवी यांना भेटतो ही जयंत पाटील यांची बोच होती.त्यामुळं जेव्हा शहारूख जयंत पाटील यांच्यासमोर आला तेव्हा त्यांच्या मनातला सारा राग समोर आला.माझ्या परवानगी शिवाय तू अलिबागला येऊ शकत नाहीस ही त्यांनी दिलेली धमकी दळवी- पाटील संबंधाचा भाग समजली जात आहे.राजकीय मंडळी कुठं कुठं राजकारण नेतील कळत नाही खरंय ना ?

मुंबई-अलिबाग समुद्र मार्गे वाहतूक सुरू झाल्यानंतर अनेक मुंबईकरांनी अलिबागच्या किनार्‍यावर बंगले घेतले आहेत.अगदी मध्यमवर्गीयांनी देखील फ्लॅट खरेदी करून विक एन्डला अलिबागला जाम्याची व्यवस्था केलेली आहे.स्थानिक पुढार्‍यांना हे बाहेरचे ‘आक्रमण’ वाटते. बाहेरचं हे आक्रमण वाढत गेलं तर आपलं अस्तित्व धोक्यात तर येईलच त्याचबरोबर स्थानिक राजकीयदृष्टया जागृत होऊन आपलं राजकारणही धोक्यात येईल अशी कायम भिती स्थानिक पुढार्यांना वाटत असते.त्यामुळं बंगले घेणार्‍यांना विविध अडचणींना तोंड द्यावं लागतं.जयंत पाटील यांना पोलिसांनी अडविलं असेल तर त्यात शहारूखची काही चूक नाही पण हा संदर्भ बाहेरचे आणि स्थानिक असा  आणि त्याला पाटील -दळवी वादाचाही संदर्भ आहेच.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here