जत येथील टीव्ही रिपोर्टर हरिश शेटे यांच्यावर काल रात्री साडेदहाच्या सुमारास जमावाने हल्ला चढविला.ज्या ठिकाणी दुष्काळग्रस्त पाण्यासाठी उपोषणाला बसले होते त्याच्या समोरच जतच्या कोतवालाच्या मुलाच्या वाढदिवसाची ओली पार्टी सुरू होती.दुष्काळग्रस्त जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचा हा प्रयत्न होता.या ओल्या पार्टीचे शुटिंग करताना शेटे यांच्यावर हल्ला केला गेला.त्यांच्या कॅमेर्याची मोडतोड करण्यात आली आहे.पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने या हल्ल्याचा निषेध केला आहे.