पर्यटकांचं आकर्षण असलेला अजिंक्य जंजिरा किल्ला काल धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सदस्यांनी एकदम चकाचक करून टाकला.किल्ल्यावर वाढलेली काटेरी झुडपे,अस्ताव्यस्त पडलेल्या पाण्याच्या बाटल्या,कागदाचे तुकडे 800च्यावर सदस्यांनी स्वच्छ केली.सकाळपासून सुरू असलेल्या जंजिरा स्वच्छता मोहिम सायंकाळपर्यंत सुरू होती.त्यामुळं जंजिरा किल्ला मोकळा श्वास घ्यायला लागला आहे.ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं प्रतिष्ठानच्यावतीनं ही मोहिम हाती घेतली होती.मुरूड जंजिर्याच्या नगराध्यक्षा स्नेहा पाटील आणि तहसिलदार उमेश पाटील याच्या हस्ते स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ केला गेला.नंतर दिवसभर हे काम सुरू होते.किल्ल्यावरील घाण,अस्वच्छता याबद्दल पर्यटक सातत्यानं तक्रारी करीत होते मात्र त्याची कोणीच दखल घेत नव्हते.आता किल्ला स्वच्छ झाल्याने पर्यटकांनीही त्याचे स्वागत केले