बीडः स्थानिक आणि जिल्हास्तरीय वृत्तपत्रे टिकली पाहिजेत,ही सारी चळवळ मोडीत काढण्याचे प्रयत्न सरकारी पातळीवर सुरू आहेत,सर्वांनी एकसंघपणे याला विरोध केला पाहिजे असे मत एस.एम.देशमुख यांनी व्यक्त केले आहे.
बीड येथील कश्मकश दैनिकाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

ते म्हणाले,छोटया वृत्तपत्रांच्या नरडीला नख लावून सारा मिडिया ठराविक कंपन्यांच्या ताब्यात देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.राज्यातील 324 वृत्तपत्रे सरकारी यादीवरून काढली गेली आहेत.अजून 700 वर्तमानपत्रे यादीवरून काढली जात आहेत.आज काहीजण जात्यात आहेत पण उद्या सुपातलेही जात्यात जाणार आहेत.त्यामुळं जे जात्यात आहेत त्यांच्यासाठी संघटीत आावाज उठविला गेला पाहिजे.कारण उद्या सुपातले जात्यात जाणार आहेत हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे. देश पातळीवर डीएव्हीपीनंही मोठ्या प्रमाणात कुर्‍हाड चालवायला सुरूवात केल्याने छोटी वर्तमानपत्रे पुढील काळात बंद झालेली दिसतील.मिडिया मुठभर मंडळीच्या ताब्यात गेल्यास तो लोकशाहीसाठी मोठाच धोका असल्याचा इशारा देशमुख  राज्यात छोटया आणि जिल्हास्तरीय वृत्तपत्रांवर दोन लाख लोकांचा संसार अवलंबून आहे.सरकार एकीकडं छोटया उद्योगांना प्रोत्साहन देत असतानाच छोट्या वृत्तपत्रांची ही चळवळ मोडीत काढण्याचा प्रयत्न सरकार करीत असल्याबद्दल देशमुख यांनी संताप व्यक्त केला.यांनी दिला.यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.–

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here