छोट्या आणि मध्यम वर्तमानपत्रांचे प्रश्न गेली अनेक वर्षे प्रलंबित आहेत.जाहिरात धोरण सरकार अशा पध्दतीनं तयार करतंय की,जिल्हा स्तरीय वर्तमानपत्रे बंदच पडली पाहिजेत .त्याबद्दल राज्यभर मोठा असंतोष आहे.या मुद्दावर मराठी पत्रकार परिषद ने आक्रमक भूमिका घेण्याचा निर्णय घेतलेला आहे.त्यासाठी येत्या रविवारी म्हणजे 6 जुलै रोजी पुणे येथील जिल्हा पत्रकार संघाच्या कार्यालयात एका बैठकीचे आयोजन कऱण्यात आंलं आहे.बैठकीस परिषदेचे पदाधिकारी सर्वश्री किरण नाईक ( अध्यक्ष) चंद्रशेखर बेहेरे ( कार्याध्यक्ष) संतोष पवार ( सरचिटणी) आणि सुभाष भारद्वाज ( उपाध्यक्ष ) सिध्दार्थ शर्मा उपस्थित राहणार आहेतच पण त्याचबरोबर या मुद्दयावर पत्रकारांच्या ज्या ज्या संघटनांना असे वाटते की,आवाज उठविला पाहिजे अशा सर्व संघटनांच्या प्रतिनिधींनी देखील बैठकीस उपस्थित राहावे अशी विनंती मराठी पत्रकार परिषदेच्यावतीन करण्यात आली आहे.जे समान प्रश्न आहेत अशा मुद्यावर एकत्र आल्याशिवाय कोणताच प्रश्न मार्गी लागणार नाही.तेव्हा येत्या रविवारी सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीस यावं ही विनंती आहे.या बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा ठरविली जाणार आहे.पत्रकारांच्या अन्य प्रश्नांवर देखील चर्चा होऊन निर्णय घेतला जाणार आहे.
बैठक- रविवार दिनांक 6 जुलै
वेळ – दुपारी 1 वाजता
स्थळ- पुणे जिल्हा पत्रकार संघाचे कार्यालय,जुन्या जिल्हा परिषदेसमोर,कॅम्प,पुणे
संपर्कासाठी नंबर- शरद पाबळे ( अध्यक्ष पुणे जिल्हा पत्रकार संघ )9822083111
बापू गोरे-( कार्याध्यक्ष पुणे जिल्हा पत्रकार संघ 9545222212