छोटासा हातभार..
बीड जिल्ह्यातील देवडी असेल किंवा राजेवाडी ही सारी गावं आडवळणावरची.. कधी काळी सातवीनंतर शिक्षणाचीही येथे सोय नव्हती.. आज दोन्ही ठिकाणी माध्यमिक विदयालयं आहेत.. आसपासच्या गावातील मुलंही इथं शिक्षण घेण्यासाठी येतात .. काही ठिकाणाहून मुलींच्या आणण्या-नेणयाची व्यवस्था सरकारनं केली असली तरी मुलं या व्यवस्थेपासून वंचित आहेत .. घरची गरीबी असल्याने अनेक मुलांना साईकल घेणे देखील शक्य होत नाही.. तीन चार किलो मिटर चालत यायचे तर मुलांचा वेळ आणि श्रम वाया जातात.. मुलांची ही अडचण लक्षात घेऊन आमचे बंधू दिलीप देशमुख यांनी “साईकल बॅंके” चा अभिनव उपक्रम महाराष्ट्रात सुरू केला आहे.. कल्पना अशी आहे की, गरजू मुला मुलींना मोफत साईकल द्यायची, तिचे किंवा त्याचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ही साईकल शाळेत जमा करायची.. तीच साईकल नंतर दुसरया विद्यार्थ्यांना द्यायची.. या योजनेंतर्गत महाराष्ट्रात एक हजार सायकलीचे वाटप करण्याचा संकल्प दिलीप देशमुख यांनी सोडला आहे.. या उपक्रमाचा भाग म्हणून २० फेब्रुवारी रोजी राजेवाडी येथे २० आणि देवडी येथे १० गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकलचे वाटप करण्यात आले.. आमचे वडिल माणिकराव देशमुख आणि राजेवाडी येथील जयभवानी शिक्षण संस्थेचे चेअरमन मोहनराव जगताप यांच्या हस्ते राजेवाडीत सायकलचे वाटप करण्यात आले. देवडी येथे गावच्या माजी सरपंच आणि आमच्या मातोश्री सौ. लिलाबाई माणिकराव देशमुख आणि वडिल माणिकराव देशमुख यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप करण्यात आले.. आपल्या भाषणात दिलीप देशमुख यांनी या योजनेमागची कल्पना विस्ताराने मांडली.. मुलांचा वेळ वाचावा, वाचलेल्या वेळेचा त्यांना अभ्यासासाठी ऊपयोग करता यावा आणि त्यांनी चांगला अभ्यास करून विशेष प्राविण्य मिळवावे.. अशी या मागची कल्पना असल्याचे त्यांनी सांगितले.. एवढेच नव्हे तर या सायकल बॅंकेचा लाभ घेऊन ज्या मुलांना ८५ टक्क्यापेक्षा जास्त गूण मिळतील अशा विद्यार्थ्यांना प्रत्येकी १० हजार रूपये बक्षीस देण्याची घोषणा देखील त्यांनी केली..
आमच्या मातोश्री दोन वेळा गावच्या सरपंच होत्या.. सलग ४५ वषेॅ ग्रामपंचायत सदस्य होत्या.. वडिल माणिकराव देशमुख देखील अनेक वर्षे गावचे कारभारी होते.. त्यांनीही गावात अनेक समाजोपयोगी कामं केली आहेत… माणिकराव देशमुख यांनी नुकतेच गावातील नागरिकांसाठी नेत्रतपासणी शिबिर घेतले.. त्याचा लाभ अनेक गरजू लोकांनी घेतला.. वृक्षारोपणाची चळवळीचे महत्व लोकांना पटावे यासाठी माणिकराव देशमुख यांनी आपल्या शेतातील बांधावर विविध जातीची दोनशेवर झाडं लावली, मध्यंतरी देवडी येथील जिल्हा परिषद शाळेला काही ग्रंथ भेट देऊन त्यांनी मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी छोटासा प्रयत्न केला.. वडिलांच्या सूचनेनुसार गावच्या नदीवर बंधारा बांधण्याचा प्रकल्पही लवकरच सुरू करण्यात येत आहे.. हे सारे प्रयत्न छोटेसे आहेत पण ग्रामीण जनतेत नवे विचार रूजविणयासाठी हे प्रयत्न नक्कीच आवश्यक आहेत.. दिलीप देशमुख यांच्यावतीने देण्यात येणारया सायकलचे वाटप गरीब मुलांना करताना आई – वडिल दोघेही भाऊक झाले होते.. कारण ते गावातच राहतात आणि गावातच राहतात आणि परिसरातील परिस्थितीशी ते पूर्णपणे परिचित आहेत..त्यामुळेच त्यांनी गावात विविध उपक्रम राबविले.. सामाजिक बांधिलकी जपण्याची आपण मुलांना दिलेली शिकवण ते विसरले नाहीत याचा आनंद आई आणि भाऊंना नक्कीच झाला होता..आमच्या देशमुख परिवारासाठी सायकल वाटपाचा हा कार्यक्रम अविस्मरणीय ठरला यात शंका नाही..
मुख्याध्यापक बोचरे सर यांनी आभार मानले तर आमचे बंधू प्रशांत खडके यांनी प्रास्ताविक केले.. काय॓क़मास ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते..