मुंबईः जय महाराष्ट्रचे वृत्तछायाचित्रकार आशिष राणे छायांकनाचे काम करीत असताना पोलिसांनी त्यांना अत्यंत निर्दयपणे मारहाण केली आहे.मुंबई बाग आंदोलनाचे छायांकन करीत असताना नागपाडा पोलिसांनी त्यांना मारहाण केली.मराठी पत्रकार परिषद आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती या मारहाणीचा धिक्कार करीत असून या प्रकरणाची चौकशी करून जबाबदार असलेल्या पोलिसांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करीत आहे.मुंबईत पत्रकार आणि छायाचित्रकारांवर सातत्यानं पोलिसांकडूनच हल्ले होत आहेत.गेल्या पंधरादिवसातला हा तिसरा प्रकार आहे.
8 डिसेंबर 2019 रोजी राज्यात पत्रकार संरक्षण कायदा लागू झाल्याने समाजकंटकांकडून होणार्या हल्ल्यात घट झाली असली तरी पोलिसांकडून होणारे हल्ले वाढल्याचे दिसत आहेत.मारहाण करणार्या पोलिसांवर पत्रकार संरक्षण कायद्याखाली गुन्हा दाखल होऊ शकतो का याबाबत कायदातज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्यात येत आहेत.