जगात वर्षभरात 80 पत्रकारांच्या हत्त्या
पत्रकारांची सुरक्षा हा जागतिकस्तरावरील चिंतेचा विषय बनला आहे.2018 हे साल तर पत्रकारांसाठी अधिकच चिंतावाढविणारे ठरले आहे.कारण कमिटी टू प्रोटेक्ट जर्नालिस्ट या अमेरिकेतील संस्थेच्या पाहणीनुसार जगभरात यंदा 53 पत्रकारांची हत्त्या झाली.मात्र रिपोर्टर्स विदाऊट बॉडर्स या संघटनेच्या अहवालानुसार हा आकडा 80 एवढा मोठा आहे.भारतात यावर्षी 7 पत्रकाराचे खून झाल्याची माहिती पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीनं यापुर्वीच प्रसिध्द केली आहे.वार्तांकनाचा बदला घेण्यासाठी हे खून झाल्याचा दावा वरील तीनही संस्थांनी केला आहे.ज्यांची हत्या झालीय त्यात ब्लॉगर्सचा देखील समावेश आहे.द वॉशिग्टन पोस्टचे पत्रकार जमाल खशोगी यांची अलिकडंच सौदी अरेबियात झालेली हत्या ही जगाला हादरवून टाकणारी घटना ठरली.
कमिटी टू प्रोटेक्ट जर्नालिस्ट या संस्थेचा दावा असाय की,गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत यंदा पत्रकारांच्या हत्यांची संख्या अधिक आहे.2017 मध्ये 47 पत्रकार मारले गेले होते.
खशोगी यांची हत्त्या झाल्यानंतर व्हाईट हाऊसनं माध्यम स्वातंत्र्याचा पुरस्कार केला असला तरी खशोगी यांची हत्या झाल्यानंतरही अमेरिकेने विशेष काही केले नाही.त्यामुळं चोथा स्तंभ धोक्यात आहे असं सीपीजेचं म्हणणं आहे.महाराष्ट्रातही पत्रकारांवर हल्ले झाल्यानंतर,पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखले केले जात असतानाही सरकार मात्र मख्य आहे.जागतिक स्तरावर हेच चित्र आहे.पत्रकार मारले जात असताना कुठेही त्याचा जोरदार निषेध होत नाही,सरकार काही करीत नाही किंवा समाजही समोर येऊन चौथ्या स्तंभाच्या रक्षणासाठी आक्रोश करताना दिसत नाही.