चेतन भैरम यांना शेती मित्र पुरस्कार

0
981

 भंडारा : कृषी क्षेत्रातील उल्लेखनिय कामगिरीची दखल घेऊन लिखाण केल्याबद्दल राज्य शासनाच्या कृषी मंत्रालयाने दै. देशौन्नतीचे जिल्हा प्रतिनिधी तथा भंडारा जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन भैरम यांना वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार जाहिर केला आहे. या पुरस्काराचे स्वरुप रोख ३० हजार, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे आहे. लवकरच एका विशेष समारंभात राज्यपाल, मुख्यमंत्री व इतर अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार चेतन भैरम यांना प्रदान करण्यात येणार आहे. चेतन भैरम यांच्या कृषी क्षेत्रातील विकासात्मक व टीकात्मक विविध लिखाणाबद्दल दखल घेत हा पुरस्कार देण्यात येत आहे. संपूर्ण विदभार्तून शेतीमित्र पुरस्कार जाहिर होणाºया पत्रकारामध्ये फक्त चेतन भैरम यांचं नाव आहे हे विशेष. यापूर्वी चेतन भैरम यांना महात्मा गांधी तंटामुक्त अभियानावर विशेष लिखाण केल्याबद्दल विभागीय स्तरावरचे गृह मंत्रालयाचे पारितोषिक मिळालेले आहेत.पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक तथा मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष एस.एम.देशमुख आणि परिषदचे अध्यक्ष किरण नाईक यांनी चेतन भैराम यांचे अभिनंदन केले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here