नवीन शैक्षणिक वर्षाच्या कालच्या पहिल्या दिवशी रायगड जिल्हयातील शांंळांमधून जवळपास चार लाख विद्यार्थ्यांनी हजेरी लावली.जिल्हयातील पहिली ते सातवी पर्यतच्या 2 हजार 854 शाळांमधून 2 लाख 46 हजार 168 विद्यार्थींनी प्रवेश घेतलेला आहे.यामध्ये 2 लाख 27 हजार 935 मराठी माध्यमाचे 15,700 उर्दु माध्यमाचे 2,124 हिंदी माध्यमाचे 112 विद्यार्थी गुजराती माध्यमाचे आहेत.माध्यमिक शाळांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या देखील दोन लाखांच्या वरती आहे.काल ठिकठिकाणच्या शाळामधून विद्यार्थ्यांचे स्वागत कऱण्यात आले.विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पुस्तके देण्याची योजना तयार कऱण्यात आली होती पण जवळपास पन्नास टक्के विद्यार्थ्य़ंनी काल ती न मिळाल्याने जिल्हा परिषदची योजना यशस्वी होऊ शकली नाही.