जातीपातीच्या शृखलातून दलितांना मुक्ती मिळावी यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 20 मार्च 1927 रोजी महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह करून सामाजिक क्रातीचे रणशिंग फुंकले होते.या ऐतिहासिक घटनेचा 89 वा वर्धापन दिन आज महाडमध्ये साजरा होत असून या निमित्त महाडमध्ये भीमसागर लोटला आहे.काल रात्रीपासूनच राज्याच्या कानाकोपर्यातून आंबेडकरांचे हजारो अनुयायी महाड नगरीत दाखल झाले आहेत.या कार्यक्रमास भारतीय रिपल्बिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदास आठवले,प्रकाश आंबेडकर,जोगेंद्र कवाडे,आनंदराज आंबेडकर मनोज संसारे आदि उपस्थित राहणार आहेत.एमआयएम पक्षाचे आमदार वारीस पठाण आणि इम्पियाज जलिल यांची उपस्थिती चर्चेचा विषय ठरणार आहे.एमआयएमच्या दोन्ही आमदार येणार असल्याने शिवसेने शहरात फलक लाऊन एमआयएमच्या आमदारांनी भारत माता की जय म्हटले नाही तर शिवसेना आपल्या स्टाईलने उत्तर देईल असे फलक लावल्याने शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.-