गरिब,दलित,कामगार,सामांन्य वर्गाच्या हितासाठी आणि हक्कासाठी आयुष्यभर लढणाऱ्या कॉ.गोविंद पानसरे यांची झालेली हत्त्या ही चळवळीतील प्रत्येक कार्यकर्त्यांना सुन्न कऱणारी घटना आहे.गोविंद पानसरे जो विचार घेऊन काम करीत होते तो विचार त्यांची हत्त्या झाल्याने संपणार नसला तरी त्यांच्या निधनाने चळवळीचा मात्र कणा गेला हे वास्तव नाकारता येणार नाही.चळवळी हा महाराष्ट्राचा श्वास आहे.चळवळींच्या बळावरच महाराष्ट्र उभा राहिला आहे.मात्र सत्ताधारी असोत की,समाजाची चक्रे उलट्या दिशेने फिरवायचा प्रय़त्न करणाऱ्या प्रतिगामी शक्ती असोत ,किंवा धनदांडगे असोत नाही गुंडाच्या टोळ्या असोत या सर्वांनाच सर्वाधिक भिती वाटते ती चळवळींची आणि चळवळीतल्या कार्यकर्त्यांची.त्यांची अडचण अशी असते की,हे कार्यकर्ते आपल्या विचारांशी चतजोड करीत नाहीत,आपल्या ध्येयापासून विचलित होत नाहीत आणि यांना विकतही घेता येत नाही.अशा स्थितीत या चळवळीच संपल्या तर..सारेच प्रश्न सुटतील असे सत्ताधारी वर्गाला आणि ज्यांचे हितसंबंध चळवळींमुळे धोक्यात येतात अशा घटकांना वाटत असते.त्यामुळ चळवळींचा बिमोड करण्याकडेच सर्वांचा कटाक्ष असतो. चळवळीतल्या कार्यकर्त्यांच्या समाजहिताच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून त्यांची उपेक्षा करायची,कार्यकर्त्यांमध्ये नैराश्य येईल असे वातावरण तयार करायचे,चळवळीत फूट पडेल अशी स्थिती निर्माण करायची.अशा पध्दतीनं अनेक चळवळी मोडून काढल्या गेल्या आहेत.मुंबईतल्या कामगारांची चळवळ, राज्यातील कष्टकरी वर्गााची चळवळ, शेतकऱ्यांच्या चळवळीसारखी अनेक उदाहरणे देता येतील. हे सारं करूनही ज्या चळवळी मोडता येत नाहीत.अशा चळवळीतल्या प्रमुखांवर हल्ले करायचे किंवा त्यांच्यावर गोळ्या झाडून त्यांचा आवाज कायमचा बंद कऱण्याचे नवे तंत्र अवलंबिले जात आहे.अगोदर नरेंद्र दाभोळकर यांची हत्त्या याच जाणिवेतून झाली.आता गोविंद पानसरे यांना संपवून सामांन्य जनतेसाठी उठणारा आवाज कायमचा बंंंंंंंंद केला गेला आहे.दाभोळकर,पानसरेंनंतर आता नंबर कोणाचा अशी भितीयुक्त चर्चा महाराष्ट्रात सुरू आहे.ही परिस्थिती केवळ चिंताजनकच आहे अशी नाही तर महाराष्ट्र चुकीच्या वाटेवरून जात असल्याची जीणीव करून देणारीही आहे.
कॉ.पानसरे यांची हत्त्या कोणी केली ते अजून समोर यायचे आहे.मात्र ज्यांनी हे कृत्य केले आहे किंवा जे या कटातले सूत्रधार आहेत ते चळवळीचे नक्कीच मारेकरी आहेत यात शंकाच नाही.एक एकाला टिपून चळवळीतील कार्यकर्त्यांच्या मनात दहशत,भिती निर्माण करायची आणि राज्यातील चळवळींचा पायाच उखडून टाकायचे षडंय़ंत्र यामागे आहे हे नक्कीच. हितसंबधियांचे हे षडंयंत्र यशस्वी होणार नाही याची काळजी घेण्याची जबाबदारी चळवळींवर विश्वास असलेल्या प्रत्येकाची आहे.चळवळी थांबल्या तर महाराष्ट्राची दुर्दशा झाल्याशिवाय राहणार नाही हे नक्की.कारण समाजहिताच्या विरोधात घेतला गेलेल्या कोणत्याही निर्णय़ाच्या विरोधात आवाज चळवळीतूनच उठतो.राजकीय पक्ष हे संधीसाधू असल्याने आणि साऱ्यांचीच मिलीभगत असल्याने ते परस्परांना पाठिशी घालत असतात हे अनेकदा आपण पाहिले आहे.भूसंपादनाच्या कायद्याच्या विरोधात अण्णांनाच आंदोलन करावे लागत आहे विरोधी पक्षांंना त्याची गरज वाटत नाही ही गोष्ट दुर्लक्षिता येणार नाही.त्यामुळे चळवळी अधिक प्रभावी होतील यासाठी समविचारी मंडळींनी प्रयत्न कऱणे हीच डॉ.दाभोळकर,पानसरे यांना खरी श्रध्दांजली ठरेल असे मला वाटते.( एस.एम.)
(Visited 137 time, 1 visit today)