घारापुरीतला अंधार संपणार 

0
718
सुंदर लेण्यांमुळे देशी-विदेशी पर्यटकांचं आकर्षण ठरलेल्या घारापुरी बेटावरील वर्षानुवर्षांचा अंधार आता संपत असून बेटावर वीज पुरवठा करण्यासाठी एमएमआरडीएने महावितरण कंपनीला 20 कोटी रूपये दिले आहेत.महावितरणने टेंडर प्रक्रियाही सुरू केली आहे.येत्या महिन्याभऱात टेंडर प्रक्रिया पूर्ण होऊन  वीज पुरवठा कऱणार्‍या वाहिन्या टाकण्याचे काम 15 ऑगस्ट पासून सुरू होईल.त्यामुळे यंदाची दिवाळी घारापुरीवासियांसाठी सर्वोच्च आनंद देणारी ठरणार आहे.दिवाळीपुर्वी हे बेट 24 तास विजेनं उजळणार आहे.
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत बेटावरील विजेसाठी 20 कोटी रूपये देण्याचा निर्णय घेतला गेला.सध्या घारापुरी बेटाला रात्री सात ते साडेदहा या काळात रॉकेल इंजिनच्या माध्यमातून वीज पुरवठा होतो.त्यासाठी एमएमआरडीए महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळास 28 लाख रूपयांचे अनुदान देते.मात्र रात्री वीज नसल्याने पर्यटकांना बेटावर थांबता येत नाही.त्यामुळे बेटासाठी 24 तास वीज पुरवठा करण्याची मागणी बेटावरील शेतबंदर,मोराबंदर,आणि राजबंदर या गावातील नागरिक करीत होते.केवळ पर्यटनावर अवलंबुन असलेल्या या गावांना आता वीज येत असल्याने दिलासा मिळणार असून वीज आल्याने पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ होणार असल्याचे ग्रामस्थ सांगतात.ः शोभना देशमुख ,घारापुरी रायगड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here