देशाची राजधानी दिल्लीपासून अगदी जवळ असलेल्या गाझियाबाद येथे एका टीव्ही पत्रकारावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. हल्लेखोराने रविवारी पत्रकाराच्या घरात घुसून त्यांच्यावर गोळी झाडली. अनुज चौधरी असं पत्रकाराचं नाव आहे, त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला असून फरार हल्लेखोराचा शोध घेतला जात आहे.
रद्द मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मोटारसायकलवर आलेल्या हल्लेखोराने पत्रकाराच्या घरात घुसून त्यांच्यावर गोळी झाडली. नेमके किती हल्लेखोर होते याबाबत अजून माहिती मिळालेली नाही. अनुज चौधरी हे एका हिंदी न्यूज चॅनलमध्ये काम करतात. त्यांची पत्नी बहुजन समाज पक्षाची नगरसेवक आहे. जुन्या वादातून हा हल्ला झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे, तरीही आम्ही सर्व बाजूंनी घटनेची चौकशी करत आहोत असं पोलीस म्हणाले.