चर्चासत्र
ग्रामीण पत्रकारिताः दशा आणि दिशा
महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात राहून तिथल्या प्रश्नांशी भिडणारे,तिथल्या विकासात महत्वाची भूमिका पार पाडणारे,प्रसंगी पदरमोड करून सामाजिक बांधिलकी जपणार्या ग्रामीण पत्रकारांची दुःख शहरात बसून समजणारी नाहीत.वृत्तपत्रे मानधन तर देतच नाहीत पण साधं नियुक्ती पत्र,ओळखपत्रही देत नाहीत किंवा अधिस्वीकृती मिळावी यासाठी मदतही करीत नाहीत.वरती जाहिरातींचा रेटा सुरूच असतो.एकीकडं समाजाच्या पत्रकारांकडून असलेल्या ढिगभर अपेक्षा आणि दुसरीकडे व्यवस्थापनाकडून होणारी उपेक्षा अशा चरख्यात आज ग्रामीण पत्रकार भरडून निघत आहे.एखादया वेठबिगारापेक्षाही वाईट स्थितीत जगणार्या ग्रामीण पत्रकारांच्या प्रश्नावर मराठी पत्रकार परिषदेच्या अधिवेशनात चर्चा होणे अपेक्षितच नव्हे आवश्यकच आहे.ग्रामीण पत्रकारितेबद्दल नाकमुरडणारे जसे आहेत तसेच ग्रामीण पत्रकारितेबद्दल चिंता व्यक्त करणारेही अनेक आहेत.अशा स्थितीत वास्तव समोर आणून देण्याचा एक प्रयत्न, ग्रामीण पत्रकारिताः दशा आणि दिशा या चर्चासत्राच्या माध्यमातून होत आहे . या चर्चासत्रात सहभागी होत आहेत ज्यांनी ग्रामीण पत्रकारिता जवळून पाहिलली आहे असे दिग्गज संपादक,पत्रकार.त्यामध्ये आहेत लोकमत नागपूरचे कार्यकारी संपादक गजानन जानभोर,सकाळ नाशिकचे संपादक श्रीमंत माने,लोकमत अकोला आवृत्तीचे संपादक रवी टाले,सकाळ अकोला आवृत्तीचे संपादक संदीप भांबरे आणि ज्येष्ठ पत्रकार श्यामसुंदर सोन्नर
चुकवू नये असा विषय,