पणजीः गोव्यातील माध्यम जगतात अस्वस्थतः आहे.कर्मचारी कपातीचं लोण आता गोव्यातही पोहोचलं आहे.मजिठिया द्यावा लागू नये म्हणून पत्रकार आणि पत्रकारेतर कर्मचार्यांवर बिनधास्त कुर्हाड चालविली जातेय.गोव्यातील फोमेन्तो समुहाच्या कोकणी,इंग्रजी आणि मराठी वर्तमानपत्रातून 26 पत्रकारांना नारळ दिलं गेल्यानं गोव्यातील श्रमिक पत्रकारांनी रस्त्यावर येत आंदोलन केलं.मराठी पत्रकार परिषदेचा या आंदोलनास पाठिंबा आहे.
फोमेन्तो समुहाच्या इमारतीसमोर पत्रकारांनी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे वाहन अडविले आणि त्यांच्यासमोर वस्तुस्थिती मांडली.नोकर्या गमवावे लागलेले सारे युवक -युवती गोमंतकीय असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले गेले.या संदर्भाथ व्यवस्थापन आणि श्रमिक पत्रकार संघटनेच्या पदाधिकर्यांना बोलावून निर्णय घेऊ असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे.
पणजीतील आझाद मैदानावर पत्रकारांनी निषेध सभा घेऊन संताप व्यक्त केला.यावेळी प्रकाश कामत,गुरूदास सावळ,भिकू नाईक,सुनीता प्रभूगावकर,बबन भगत आदिंची भाषणे झाली.हे वृत्तपत्र खाण कंपन्यांच्यावतीने चालविले जाते असे समजते.याबाबतचे सविस्तर वृत्त गोवा लोकमतने दिले आहे हे विशेष.
महाराष्ट्रात पडसाद
मराठी पत्रकार परिषद,पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती तसेच बीयूजे आदि महाराष्ट्रतील संघटनांनी या घटनेचा निषेध केला असून ही पत्रकार आणि पत्रकारेतर कर्मचार्यांना अशा पध्दतीनं कामावरून काढण्याची कृती बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे.बीयूजेनेही याबाबत एक पत्रक प्रसिध्द करून याचा निषेध केला आहे.ते पत्रक खालील प्रमाणे.