अ. भा. मराठी पत्रकार परिषदेच्या*
शिष्टमंडळाने घेतली गृहमंत्री दिलीप वळसे पाटील
यांची भेट

मंचर जि. पुणे : पत्रकार संरक्षण कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी करावी आणि पत्रकारावर गुन्हा दाखल करण्यापुर्वी त्याची सत्यता वरिष्ठ अधिकारयांमार्फत तपासावी अशी मागणी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या शिष्टमंडळाने आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली..
एस.एम.देशमुख यांच्या नेतृत्वाखाली परिषदेच्या शिष्टमंडळाने आज दिलीप वळसे पाटील यांची मंचर येथे भेट घेतली.. शिष्टमंडळात परिषदेचे कार्याध्यक्ष शरद पाबळे, पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष सुनील लोणकर आणि परिषदेचे माजी विभागीय चिटणीस डी. के. वळसे पाटील यांचा समावेश होता..
गृहमंत्र्यांशी चर्चा करताना एस. एम.देशमुख यांनी राज्यात पुन्हा एकदा पत्रकारांवरील हल्ले मोठ्या प्रमाणात वाढल्याचे सांगितले.. गेल्या दोन दिवसात मुंबई, चाकुर, श्रीगोंदा आदि ठिकाणी पत्रकारांवर हल्ले झाले आहेत.. या प़करणील हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याचा मागणी एस.एम.देशमुख यांनी केली..
राज्यात पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करून पत्रकारांची कोंडी करण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत..एक सत्य बातमी दिल्यामुळे केज येथील पत्रकारांवर खोटा गुन्हा दाखल केल्याचे देशमुख यांनी वळसे पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले.. पत्रकारांवर गुन्हा दाखल करण्यापुर्वी त्याची सत्यता वरिष्ठ अधिकारयांमार्फत तपासून पहावी अशी मागणी देखील शिष्टमंडळाने केली..वरील मागण्यांसंदर्भात दिलीप वळसे पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देत योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले..
पत्रकारांचे पेन्शन, आणि अन्य प़श्न प़लंबित आहेत. पत्रकारांना कोरोना फ़न्टलाईन वर्कर म्हणून जाहीर करावे आणि ज्या १५५ पत्रकारांचे कोरोनानं निधन झालं आहे अशा सर्व पत्रकारांच्या नातेवाईकांना १० लाख रूपयांचे अनुदान द्यावे आदि मागण्या सातत्यानं सरकारकडे केल्या जात आहेत.. परंतू या संबंधी कोणताच निर्णय होत नसल्याने आपण पुढाकार घेऊन मुख्यमंत्र्यांसोबत बैठक लावावी अशी विनंती वळसे पाटील यांच्याकडे केली असता, मुख्यमंत्र्यांशी बोलून अशी बैठक लावण्याचे आश्वासन त्यांनी शिष्टमंडळास दिले.. जवळपास अर्धा तास ही बैठक झाली..

(Visited 39 time, 1 visit today)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here