गिधाडांची घटत जाणारी संख्या हा जागतिक चिंतेचा विषय असताना म्हसळा तालुक्यातील सिस्केप संस्थेच्या पुकाराने आणि चिरगाव ग्रामस्थांच्या सहकार्याने चिरगाव येथे गिधाड संवर्धनाचा अनोखा उपक्रम राबविला जात आहे.या प्रकल्पामुळे नैसर्गिक अधिवासातील गाधाडांची संख्या वाढविण्यात मोठ्या प्रमाणात यश मिळाले आहे.
भारतात सरकार आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य़ातून गुजरात, आसाम,पंजाब,गुजरात,झारखंड या राज्यात गिधाड संवर्धन प्रकल्प राबविले जातात मात्र चिरगाव येथे एका खासगी संस्थेच्या पुढाकाराने आणि त्यांच्या प्रय़त्नातून एक चांगले काम उभे राहते याचे सर्वत्र कौतूक होत आहे.
पुणे येथे नुकत्याच पार पडलेल्या पक्षी मित्रांच्या जागतिक परिषदेत चिरगाव गिधाड संवर्धन प्रकल्पाचे सादरीकरण झाल्यानंतर विविध देशातील पक्षी मित्रांनी चिरगावला भेट देऊन प्रकल्पाचे कौतूक केले,