महिला पत्रकारावर रेप करा – आदेश

0
790

पत्रकार परिषदेत अथवा मुलाखतीत आपणास न आवडणारा प्रश्न विचारल्यानंतर केवळ आपल्याकडंच पुढारी पत्रकारांवर भुंकतात किंवा त्यांची लाज काढतात असं नाही तर हा जागतिक रोग असल्याचं रशियातील एका घटनेतून समोर आलंय.रूसच्या लोअर हाऊसचे डप्युटी स्पिकर ब्लादिमीर जिरिनोवोस्की यांची पत्रकार परिषद सुरू होती.यावेळी एका महिला पत्रकाराने ब्लादिमीर यांना युक्रेन बाबतचा एक प्रश्न विचारला. तो त्यांच्यासाठी अडचणीचा होता.त्यामुळं त्यांनी उत्तर देण्याऐवजी डेप्युटी स्पिकर संबंधित महिला पत्रकारावर प्रचंड भडकले.आणि आपल्या समर्थकांना संबंधित महिला पत्रकारावर रेप कऱण्याचा आदेश दिला .( काही दिवसापूर्वी कर्नाटकात स्टिंग ऑपरेशन कऱताना पक़डल्या गेलेल्या एका महिला पत्रकाराच्या शर्टाचे बटन काढून तिला नग्न कऱण्याचा आदेश कर्नाटकच्या एका मंत्र्यानं दिला होता ही घटना आपल्या स्मरणात असेलच ) ड्युपिटी स्पिकर महाशय एवढ्यावरच थांबले नाहीत आपण गर्भवती असाल तर आपली प्रेस कॉन्फरन्समध्ये काही गरज नाही. असेही महिला पत्रकारास सुनावले.आपल्या पुढाऱ्याचे आदेश मानत काही समर्थक पत्रकार स्टेला दुबोवित्सकाया च्या दिशेनं धावले.त्यामुळं घाबरलेल्या स्टेलाची प्रकृती अचानक बिघडली.तिला नंतर रूग्णालयात न्यावे लागले.या प्रकाराची संपूर्ण रूसमध्ये तीव्र शब्दात निर्भत्सना सुरू आहे.सत्तेचा माज कसा असतो हे या घटनेनं जगाला दाखवून दिलंय.आपल्याकडं अजून थेट रेप करण्याचा आदेश आपल्या समर्थकांना कोणी दिल्याचे किमान बाहेर तरी आलेले नाही पण असेही होऊ शकते हे साऱ्याच पत्रकारांनी लक्षात ठेवावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here