अगरताळा येथील न्यायालयाने स्थानिक बंगाली दैनिक गणदूत चे मालक सुशील चौधरी यांना जन्मठेपेची शिक्षा टोठावली आहे.गेल्या वर्षी 19 मे रोजी गणदूतच्या 3 कर्मचाऱ्यांची दैनिकाच्या आवारात हत्त्या करण्यात आली होती.बलराम घोष( चालक) रजित चौधरी ( मॅनेजर ) सुजित भट्टाचार्य ( प्रुफरिडर) हे मृत्युमुखी पडले होते.बलरामची पत्नी नियोनित घोष ही या तिहेरी हत्याकांडाचंी साक्षिदार होती.या तिघांची हत्या मालक सुशील चौधरी यांनी केल्याचा आरोप आहे.ही घटना दुर्लभ ( रेयरेस्ट ऑफ रेयरेस्ट ) असल्याने चौधरी यांना जन्मठेपेची शिक्षा दिली गेलीय.मी निर्दोष आहे,माझं वय लक्षात घेऊन मला क्षमा करा असे आरोपीने वारंवार म्हटल्यानंतरही न्यायालाने त्यांचे एकेले नाही.सरकारी वकिलांनी आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली होती.