..स्वप्नपूर्तीचा आनंद :
मराठवाड्यातले माझं देवडी गाव दुष्काळग्रस्त.. पिण्याच्या पाण्याचाही वांदा.. गाव दोन नद्यांच्या काठावर वसलेलं असलं तरी नद्या लुप्त व्हायला आल्या..त्यातून पाण्याची मोठीच समस्या गावात उभी राहिली.. सारेच हतबल होते.. मार्गही सूचत नव्हता.. ‘दोन नद्यांचा जेथे संगम होतो त्या आडी भागात बंधारा बांधला तर गाव कायमस्वरूपी दुष्काळमुक्त होईल’ असं आमचे वडील गावचे माजी सरपंच श्री. माणिकराव देशमुख यांना सातत्यानं वाटत होतं. दोन वेळा गावचे सरपंच असताना त्यांनी त्यासाठी प्रयत्नही केला.. पण काही गैरसमजातून तेव्हा विरोध झाला.. परिणामतः हा प्रकल्प रखडला.. तरीही वडील थांबले नव्हते.. ‘हा प्रकल्प पूर्ण करा म्हणून वडिलांचा माझ्याकडे आणि बंधू दिलीप देशमुख यांच्या कडे’ सततचा आग्रह सुरू होता. .. ‘तुमच्या संबंधाचा गावच्या कल्याणासाठी उपयोग करा’ असंही ते सतत बोलत.. अखेर तो योग आला.. सकाळ रिलीफ फंडाचे प़मुख मा. प्रतापराव पवार यांच्याकडे आमचे बंधू दिलीप देशमुख यांनी शब्द टाकला ..त्यांनीही त्यास संमती दिली..आणि एका चांगल्या प्रकल्पाचा पाया रचला गेला.. आमच्या वडिलांच्या हस्ते आणि गावकर्‍यांच्या उपस्थितीत एप्रिलमध्ये कामाचा शुभारंभही झाला.दोन महिने काम चाललं.या काळात मरोठवाड्यातील प्रचंड उन्हात मी साईटवर उभं राहून होणारं काम व्यवस्थित सुरू आहे की नाही याची निगरानी करीत होतो..सुदैवानं कोणतंही विध्न किंवा अडथळा आला नाही.हाती घेतलेलं काम पूर्णत्वास गेलं.. धारूरचे इरिगेशनचे अभियंता सतीश देशपांडे यांनी तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यासाठी मदत केली. सकाळचे संपादक संजय वरकड यांचे सहकार्य आणि सकाळचे बीड जिल्हा प़तिनिधी दत्ता देशमुख यांची तळमळ आणि प्रयत्न, राजेंद्र बोबडे यांनी केलेलं बांधकाम, आमचे गावचे सहकारी तुळशीराम राऊत,बाबासाहेब झाटे यांचे सहकार्य त्यातून ऊभं राहिलं गावाचा कायापालट करणारं भव्य काम.. ७ जूनला बंधारा बांधून पूर्ण झाला.. पण मराठवाडयात पाऊसच नव्हता.. त्यासाठी तब्बल अडीच महिने प्रतिक्षा करावी लागली.. अखेर काल दिवसभर आणि रात्री परिसरात जोरदार पाऊस झाला.. दोन्ही नद्यांना पूर आले आणि आमचे स्वप्न आज फळास आले.. 81 मिटर लांबीची सिमेंट कॉंक़कीटची भिंत,800 मिटर लांबी आणि 8 कोटी लिटर साठवण क्षमता असलेलं आणि जवळपास 80 लाख रूपये खर्च करून आम्ही मोठ्या जिद्दीनं उभारलेला आडी बंधारा आज तुडूंब भरला.. या क्षणाची मी, माझे कुटुंबिय आणि समस्त गावकरी डोळ्यात प्राण आणून प्रतिक्षा करीत होतो.. तो क्षण आज प़तयक्षात आला. सकाळ रिलीफ फंडाचे मनापासून आभार..गावाचा कायापालट करण्याची क्षमता असलेली गंगा आज आमच्या अंगणी आली आहे.त्याचा झालेला आनंद वर्णनातीत आहे….Thanx God..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here