आज आणखी एका पत्रकारावर राज्यात हल्ला झाला तर अन्य एका ठिकाणी पोलिसांनी पत्रकाराला धक्काबुक्की केली.पहिली घटना रायगड जिल्हयातील खोपोलीतली आहे.पत्री सरकार या साप्ताहिकाचे संपादक सचिन यादव यांना सुरभी ज्वेलर्स चे मालक महेंद्र थोरवे आणि ज्वेलर्स असोसिएशनच्या अध्यक्षांनी मारहाण केली.या घटनेचा खालापूर प्रेस क्लबने निषेध केला आहे.
दुसरा प्रकार बीड जिल्हयातील वडवणीत घडला.पत्रकार भैय्यासाहेब तागडे अतिक्रमण विरोधी मोहिमेची छायाचित्रं काढत असताना त्यांना पोलिसांनी दमदाटी केली.त्यांना धक्काबुक्कीही करण्यात आली.या घटनेचाही पत्रकारंांनी निषेध केला आहे.
महाराष्ट्रात भाजपचे सरकार आल्यानंतर पत्रकारांवरील हल्ल्याच्या घटनांमध्ये अचानक वाढ झाली असून गेल्या सव्वा महिन्यात 16 पत्रकारांवर राज्यात हल्ले झाले आहेत.वर्षभरात पत्रकारांवर झालेल्या हल्लयाची संख्या आता 70च्या वर गेली आहे.