मराठी पत्रकार परिषदेच्या अधिवेशनातील खुले अधिवेशन हा कार्यक्रमही अत्यंत महत्वाचा असतो.परिषदेच्या अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमात उपस्थित पत्रकारांपैकी वेळेनुसार काही पत्रकारांना परिषदेबद्दल आपली मतं व्यक्त करता येतात.तसेच परिषदेच्या वाटचालीसंदर्भातही सदस्य आपली मतं मांडू शकतात.सदस्यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांना अध्यक्ष उत्तरं देतात.त्यानंतर ठराव मांडले जातात आणि ते समंत केले जातात.ज्यांना खुल्या अधिवेशनात काही ठराव मांडायचा आहे त्यांनी तो आठ दिवस अगोदर परिषदेकडे पाठविला पाहिजे.मंजूर झालेले ठरावाची अंमलबजावणी कऱण्याची जबाबदारी परिषदेच्या कार्यकारिणीवर असते.जे ठराव सरकारशी मागण्याच्या स्वरूपात निगडीत आहेत ते सरकारकडं पाठवून त्याचा पाठपुरावा परिषदेच्यावतीनं केला जातो.,साहित्य संमेलनात संमत झालेेले ठराव असोत नाही तर मराठी पत्रकार परिषदेच्या अधिवेशनात संमत झालेले ठराव असोत सरकार ते गांभीर्यानं घेत नाही हा आजपर्यंतचा अनुभव असला तरी हे सोपस्कार पाडले जातात आणि त्याबद्दल सदस्यांमध्ये कमालीची उत्सुकता असते.
पिंपरी-चिचवडच्या अधिवेशऩात रविवार दिनांक 7 जून रोजी दुपारी 2.30 ते 3.30 या वेळात खुले अधिवेशन होणार आहे.या खुल्या अधिवेशनात ज्यांना ठराव मांडायचे आहेत त्या सदस्यांनी आपले ठराव abmpp1939@gmail.com किंवा smdeshmukh13@gmail.com या मेल आय डीवर पाठवावेत.1 जून पूर्वी हे ठराव प्राप्त झाले पाहिजेत आलेल्या ठरावातून योग्य ठराव निवडून विषय नियामक समिती ते सभेपुढे ठेवेल.तेव्हा सर्वांना विनंती आहे की,आपले ठराव परिषदेकडे पाठवावेत.