केवळ मनोरंजन करणारे एफ एम रेडिओ आता बातम्याही द्यायला लागतील.तसे संकेत माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिलेत.़खासगी रेडिओंना बातम्या प्रसारित कऱण्यात परवानगी द्यावी असे माझे व्यक्तिगत मत आहे असं त्यांनी स्पष्ट केलंय.़खालगी वृत्त वाहिन्यांना चोवीस तास बातम्या देण्यास परवानगी आहे त्याच धर्तीवर रेडिओलाही अशी परवानगी द्यायला काय हरकत असा बिनतोड सवाल जावडेकर यांनी केलाय.आम्ही या मुद्याकडं अत्यंत गंभीरपणे आणि सकारात्मक भूमिकेतून पहात आहोत असंही त्यांनी सांगितलंय.त्यामुळं येत्या काही दिवसात एफ एम रेडिओ बातम्याही द्यायला लागतील असं दिसतंय