संपादकांच्या घरावर हल्ला

0
922

खामगा-बुलढाणा जिल्हयातील खामगाव येथील दैनिक लोकोपचारचे संपादक काका रूपारेल यांच्याघरावर 17च्या रात्री अज्ञात इसमांनी हल्ला करून त्यांच्या हत्येचा प्रय़त्न्‌ केला.
काका रूपारेल हे श्यामलाल रस्त्यावरील आपल्या घरी रात्री झोपले असताना 11च्या सुमारास मारेकऱ्यांनी गॅलरीतून घरात प्रवेश केला.दारावर लाथा मारत घरात घुसण्याचा प्रयत्न केला.या गोंधळाने घरातील सारेच जागे झाले.त्यांनी पोलिसांना फोन केला.तसेच शेजाऱ्यांना आवाज दिला.शेजारी लगेच धाऊन आल्याने मारेकऱ्यांचा डाव फसला आणि त्यांना तेथून पळ काढावा लागला.
काका रूपारेल यांनी याबाबतची तक्रार शहर पोलिसात दिली असून अवैध्य धंद्यावाले किंवा कॉग्रेसच्या कार्यकत्यार्ंनी आपल्या घरावर हल्ला केला असल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.रूपारेल यांनी अवैद्य धंद्याचय विरोधात सातत्यानं लिखाण केल्याने त्यांच्यावर यापुर्वी देखील हल्ला झाला होता.
पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरी अजून कोणाला अटक केलेली नाही.
खामगाव प्रेस क्लबने रूपारेल यांच्या घरावर झालेल्या हल्लयाचा निषेध केला आहे.
पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने देखील रूपारेल यांच्या घरावरील हल्ल्याचा धिक्कार केला आहे.फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर गेल्या आठ दिवसात महाराष्ट्रात 8 ठिकाणी पत्रकारांवर.त्यांच्या घरावर किंवा दैनिकांच्या कार्यालयावर हल्ले झाले आङेत.दोनच दिवसांपुर्वी मुख्यमंत्र्यांच्या गावात न ागपूर येथे भास्करच्या कार्यलायवर ङल्ला झाला होता.आता पुन्हा विदर्भातच एक्या संपादकाच्या घरावर हल्ला झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here