खानापूरच्या पत्रकारांनो

0
1230

राठी पत्रकार परिषदेनं पत्रकारांचा जो विषय हाती घेतला तो मार्गी लावला.परिषदेचं हे तर यश आहेच पण त्याचबरोबर परिषद पत्रकारांमध्ये बंधुत्वाची भावना निर्माण करण्यास आणि राज्यातील तमाम पत्रकार म्हणजे एक कुटुंब हा विचार अंमलात आणण्यात यशस्वी झाली आहे.परिषदेचं हे यश अन्य कोणत्याही विजयापेक्षा महत्वाचं आहे.एकीची ही भावना वर्षानुवर्षे जे पत्रकार संघ कार्यरत आहेत त्यांच्यात तर निर्माण झालेली आहेच पण अगदी अलिकडे जे संघ परिषदेची जोडले गेले आहेत त्यांनीही परिषदेचे ही ध्येयधोरण मान्य करून त्याबरहुकूम काम सुरू केले आहे.उदाहरण सांगली जिल्हयातील खानापूर तालुका पत्रकार संघाचं.या पत्रकार संघाचं वय जेमतेम 16 दिवसाचं ..4 डिसेंबर रोजी हा पत्रकार संघ स्थापन झाला.तो सांगली जिल्हा संघ आणि मराठी पत्रकार परिषदेशी जोडला गेला.मात्र या 16 दिवसातच संघाला एका दुर्देवी प्रसंगाला सामोरं जावं लागलं.संघाचे एक सदस्य आणि लोकमतचे खानापूरचे वार्ताहर बाळासाहेब शिंदे याचं ह्रदयाविकारानं निधन झालं.त्याचं असं अवचित जाण्याचं वय नव्हतंच.ते कमी वयात गेल्यानं त्याचं कुटुंब रस्त्यावर आलं.छोटा मुलगा,दोन मुली आणि पत्नी हा परिवार मागे सोडून गेले.ते गेल्याचं दुःख तर सार्‍यांनाच होतं.पण केवळ हळहळ व्यक्त करीत बसण्यापेक्षा कुटुंबासााठी काही भरीव करावं यासाठी दिलीप मोहिते,तालुका अध्यक्ष राजेंद्र काळे,उपाध्यक्ष प्रवीण धुमाळ,सचिव सचिन भादुले हे सारे पत्रकार एकत्र आले ..किमान एक लाख रूपये जमा करून शिंदे यांच्या परिवारास मदत करण्याचा निर्णय या पत्रकारांनी घेतला.बैठकीत प्रत्येकानं खिश्यात हात घातला.शक्य तेवढी मदत केली.काही क्षणात 38 हजार रूपये जमा झाले..उर्वरित रक्कम आता जमा करण्याचा निर्धार त्यांनी केलाय.ही रक्कम फिक्स डिपॉझिटमध्ये ठेऊन ती मुलांना उपयोगाला येईल अशी व्यवस्था करण्याची त्यांची योजना आहे.पत्रकार संघाच्या या मदत निधीस काही सामाजिक संघटनांनी हातभार लावण्याचा निर्णय घेतला आहे.बाळासाहेबांच्या जाण्यानं शिंदे कुटुंबांचं झालेलं नुकसान तर भरून येणार नाही पण ही मदत नक्तीच त्यांना अडचणीच्या वेळी उपयोगी ठरेल.परिषदेशी जोडला गेलेला कोणताही पत्रकार आता एकटा–एकाकी नाही हे वास्तव खानापूर तालुका पत्रकार संघानं पुन्हा एकदा सिध्द करून दाखविलंय..आम्हाला अभिमान आहे खानापूरच्या सर्व पत्रकार मित्रांचा..आपण सारे परिषदेचे भूषण आहात..सर्वांचे मनापासून आभार.( एस.एम.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here