खांदेरी किल्ल्याचा विकास होणार

0
856

अलिबाग- कोकणात पर्यटकांना आकर्षित करण्याच्या योजनेचा भाग म्हणून भारतीय समुद्रात असलेल्या 183 दीपगृहांपैकी निवडक दीपगृहांचा पर्यटनदृष्टया विकास करण्यात येत असून प्राायोगिक तत्वावर विकास करण्यासाठी अलिबागनजिकच्या खांदेरी किल्ल्यातील कान्होजी आंग्रे दीपगृहाची निवड कऱण्यात आली आहे.सरकारतर्फे कोकणातील पंधरा दीपगृहांची पाहणी करण्यात आली होती.त्यातून तीन दीपगृहांची निवड करण्यात आली आहे.मुबई पासून 11 नॉटिकल मैल अंतरावर असलेले खांदेरी या बेटावर पर्यटकांना भुरळ पाडू शकतील अशा अनेक बाबी आहेत.गौरवशाली इतिहास,शांत वातावरण,सभोवताली अथांग अरबी समुद्र,आणि मुंबईची समिपता लक्षात घेऊन या बेटाचा सर्वप्रथम विकास केला जाणार आहे.
खांदेरी बेटाचा पर्यटनदृष्टया विकास करताना तेथील जैवविविधतेला बाधा येणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे.बेटावर कोणतेही पक्के बांधकाम केले जाणार नाही.उत्कृष्ट लॅन्डस्केपचा पुरेपुर वापर करून पर्यटकांचा पर्यटनाचा आनंद व्दिगुणीत केला जाणार आहे.दृक-श्राव्य माध्यमातून शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहासही जिवंत कऱण्याचा प्रयत्न होणार आहे.मुंबईहून खांदेरीला फेरी सेवा सुरू करून पर्यटकांनी सागरी सफारीचा आनंद देण्याचीही योजना आहे.केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच मुंबईत या संबंधीची माहिती दिल्यानं त्याचं अलिबागकर स्वागात करीत आहेत.खांदेरीचा विकास झाल्यास अलिबागला येणाऱ्या पर्यटकांमध्ये लक्षणीय वाढ होणार आहे.

शोभना देशमुख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here