महाड ( टीम बातमीदार) रायगड जिल्हयात गेली काही दिवस कोसळत असलेल्या पावासामुळे महाड शङराला पाणी पुरवाठा कऱणाऱ्या कोथुर्डे धरणाच्या संरक्षण भिंतीजवळील काही भाग खचल्याचे काल सायंकाळी आढळून आले.याबाबतची माहिती ग्रामस्थांनी कळविल्यानंतर पाटबंधारे खात्याचे कोलाड येथील अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले.त्यानंतर त्यांनी धरणाला कोणताही धोका नसल्याची माहिती बातमीदारला दिली.महाड शहराला पाणीपुरवठ्य़ासाठी जिथं यंत्रणा उभी केलेली आहे त्या शेजारच्या भिंतीला 2 मीटर व्यासाचा आणि 20 फूट खोलीचा खड्डा पडला आहे . बातमी समजल्यानंतर महाडचे आमदार भरत गोगावले यांनीही घटनास्थळास भेट देऊन पाहणी केली.भिंतीला खड्डा पडल्याने शहराच्या पाणी पुरवठ्यात कसलाही व्यत्यय येणार नसल्याचेही स्पष्ट कऱण्यात आले आङे.
लघु पाटबंधारे विभागाच्यावतीनं 1973 साली हे धरण बांधले.धरणाची उंची 28 मीटर असून सुमारे 2.493 दशलक्ष घनमीटर पाणी साठविण्याची क्षमता आहे..हा खड्डा बुजविण्याचे काम सुरू झाल्याचे विभागातर्फे सांगण्यात आले.