अकोला – गुन्हेगारी प्रवृत्तीसह राजकिय, सामाजीक, सांस्कृतिक व धार्मीक दबाव झेलत समाजातील विकृती समोर आणण्याचे काम पत्रकारांना करावे लागते. त्यामुळेच पत्रकारीता हे कार्य सोपे नसुन इतर कुठल्याही व्यवसायापेक्षा पत्रकारीता हया व्यवसायात डोक्याला अधिक ताण पडतो आणि हा ताण सहन करण्याची क्षमता भारतीय पत्रकारीतेमध्ये आहे असे प्रतिपादन जेष्ठ पत्रकार खासदार कुमार केतकर यांनी केले. मराठी पत्रकार परिषद मुंबईशी संलग्नित अकोला जिल्हा पत्रकार संघाने स्थानिक पत्रकार भवनात आयोजीत केलेल्या मिट द प्रेस कार्यक्रमात ते बोलत होते.
मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष सिध्दार्थ शर्मा, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष शौकतअली मिरसाहेब, सरचिटणीस प्रमोद लाजुरकर,प्रा. मधु जाधव यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी जेष्ठ पत्रकार कुमार केतकर यांची रा’यसभेवर खासदार म्हणुन निवड झाल्याबद्दल त्यांचा अकोला जिल्हा पत्रकार संघा’या वतीने शाल, श्रीफ ळ, स्मृतिचिन्ह देवून भावपुर्ण सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शौकतअली मिरसाहेब यांनी केले. सिध्दार्थ शर्मा यांनी मराठी पत्रकार परिषद व अकोला जिल्हा पत्रकार संघा’या कार्याचा आढावा यावेळी सादर केला. मिट द प्रेस कार्यक्रमाचे निवेदन करतांना खा. कुमार केतकर े म्हणाले की, अनैतिक व्यवहारा’या बळावर मार्गक्रमण करू पाहणा:या सर्वांना पत्रकार हा घटक शत्रुच वाटतो आहे. त्यामुळे अनैतिक व्यवहारातील मंडळी पत्रकारांना सातत्याने बदनाम करण्याचे काम करीत असते. भारतीय पत्रकारीता मात्र कुठल्याही दबावाला बळी पडत नाही, असा इतिहास आहे. खलीस्थान चळवळ फ ोफ ावण्या’या काळात पंजाब केसरी दैनिका’या कार्यालयावर हल्ला झाला होता. पंजाब केसरीचे आठ संपादक व पत्रकारांचे हया हल्ल्यात निधन झाले होते, म्हणुन पंजाबात पत्रकारीता बंद पडली नाही. सर्व प्रकारचे ताण व दबाव झेलण्याची ताकद भारतीय पत्रकारीतेत असल्याचे ते म्हणाले. देशातील सध्या’या सामाजीक व आर्थिक स्थितीवर खा. कुमार केतकर यांनी यावेळी ङ्क्षचता व्यक्त केली. देश सध्या जनरल वार्डात आहे. लोकशाही नावा’या तज्ञ डॉक्टरांकडून उपचार न झाल्यास देश कधीही आयसीयु मध्ये जावु शकतो असे केतकर म्हणाले. मिट द प्रेस कार्यक्रमात अनौपचारीक गप्पा करतांना कुमार केतकर यांनी शेतक:यां’या आत्महत्या व पत्रकारीतेवर भाष्य केले. केतकर म्हणाले की, जीवन जगण्यासाठी शेतकरी जो संघर्ष करतो त्या संघर्षाची बातमी व्हायला हवी परंतु दुर्देवाने शेतक:यांची आत्महत्या झाल्यानंतरच बातमी केल्या जाते. जीवन जगण्यासाठी शेतकरी जो संघर्ष करतो त्या संघर्षगाथा पुढे आणण्याची गरज पत्रकार कुमार केतकर यांनी यावेळी व्यक्त केली. मिट द प्रेस कार्यक्रमात संपादक व पत्रकार संदिप भारंबे, राजेश शेगोकार, गजानन सोमाणी, अविनाश राऊत, सुर्यकांत भारतीय, अजय चौहान, विवेक राऊत, सुरेश राठोड, प्रविण ठाकरे, रामविलास शुक्ला, सुधाकर देशमुख, कमल शर्मा, राजु उखळकर, मिलींद गायकवाड, प्रबोध देशपांडे, धनंजय साबळे, अनुराव अभंग, मधु कसबे, जयेश गावंडे, जयेश जगड, निरज भांगे, समाधान खरात, विलास खंडारे, दिपक देशपांडे, बी.एस.इंगळे, मनोहर वाघमारे, वसीम अहेमद, हेमंत सरदेशपांडे, शरद शेगोकार, पंजाब वर, अनिल मावळे आङ्क्षदनी सहभाग नोंदविला.
कस्तुरी तर्फ े हॉकर्सला मदत
अकोला जिल्हा पत्रकार संघा’या मिट द प्रेस कार्यक्रमात अकोटचे वृत्तपत्र हॉकर्स अब्दुल रफि क यांना आर्थिक मदत करण्यात आली. अब्दुल रफि क यां’या डोûयां’या शस्त्रक्रियेसाठी कस्तुरीचे अध्यक्ष प्रा. किशोर बुटोले, यशवंत देशपांडे, दामोदर नुप यांनी ११ हजार रूपयांची मदत केली. हा धनादेश खा. कुमार केतकर यां’या हस्ते अब्दुल रफि क यांना प्रदान करण्यात आला.