– कोकण शिक्षक मतदारा संघात आश्चर्यकाररित्या मतदार वाढले
कोकण शिक्षक मतदार संघातील मतदारांमध्ये आश्चर्यकारकरित्या प्रचंड वाढ झाल्याने निवडणूक आयोगाचे डोळे विस्फारले गेले आहेत.त्यामुळं बोगस मतदान होण्याची शक्यता गृहित धरून ते टाळण्यासाठी कडक कारवाईचा इशारा निवडणूक यंत्रणेनं दिला आहे.राज्यातील शाळांमधून गेल्या पाच वर्षांपासून नवीन शिक्षकांची भरती झालेली नाही तरीही रायगड जिल्हयातील शिक्षक मतदारांमध्ये दुप्पट वाढ झालेली आहे.रायगड जिल्हयात पाच हजार शिक्षक मतदाारंची नोंद असताना यावेळची मतदार संख्या 10 हजार 9 पर्यंत वाढली आहे.यामध्ये मतदानाचा अधिकार नसलेल्यांचा समावेश केला गेला असावा अशी शक्यता निवडणूक आयोगाला वाटते आहे.मतदानाचा अधिकार नसलेल्या एकाही मतदाराने मतदान केले तर त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल असा इशारा निवडणूक आयोगाने दिला आहे.कोकण शिक्षक मतदार संघाची ही निवडणूक परवा 3 फेब्रुवारी रोजी होत आहे..-