कोकण रेल्वेचे दुपदरीकरण आणि विद्युतीकरणाच्या कामांना येत्या 31 ऑक्टोबरपासून सुरूवात कऱण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी नवी मुंबईतील एका कार्यक्रमात काल दिली.दुपदरीकरणास 15 हजार कोटी रूपये खर्च येणार असून त्यासाठी जागतिक बॅकेने कर्जपुरवठा कऱण्याची तयारी दर्शविली आहे.आगामी चार वर्षात हे काम पूर्ण करण्यात येईल असेही प्रभू यांनी स्पष्ट केले.कोकण रेल्वे मार्गावर वाहतूक प्रचंड वाढली असली तरी एकेरी मार्गामुळे गाड्यांना वेळ होतो.त्यासाठी दुपदरीकरण आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.दरम्यान कोकण रेल्वे टर्मिनश कुठे होणार या वादावर आता पडदा पडला असून ते सावंतवाडी येथेचे होणार असल्याचे रेल्वे मंत्र्यांनी स्पष्ट केले.– कोकण रेल्वे लवकरच दुपदरी