कोकण रेल्वेच्या मुगुटात आता आणखी एक मानाचा तुरा रोवला जात आहे.कोकण रेल्वेच्या सीएसटी ते मडगाव दरम्यान लवकरच डबलडेकर रेल्वे सुरू होत असून त्याची पहिली चाचणी काल रोह्यापर्यत पार पडली.ही डबलडेकर गाडी पूर्णपणे वातानुकूलीत असेल.आणखी काही चाचण्या पुर्ण झाल्यानंतर आणि सुरक्षा विषयक अहवाल आल्यानंतर आठवडा भरात ही सेवा कायमस्वरूपी सुरू कऱण्याबाबत निर्णय घेण्यात येईल,
कोरेच्या सीएसटी-मडगाव दरम्यान धावणाऱ्या डबलडेकरचे दहा डबे गेल्या आटवड्यात मुंबईत दाखल झाले आहेत.या लोकमान्य टिळक टर्मिनस येथे या डब्यांची देखरेख होत आहे.
रोह्याच्या पुढील चाचण्या घेण्यासाठी रेल्वेच्या रिसर्च डिझाईन ऍन्ड स्टॅन्डर्ड ऑर्गनायझेशन विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि तज्ज्ञाचे पथक मुंबईत दाखल झाले आहे.या पथकानं पाहणी केल्यानंतर मुख्य सुरक्षा आयुक्तही या मार्गाची पहाणी कऱणार आहेत.या चाचण्यांचे अहवाल आठवडाभरात येतील आणि त्यानंतर या मार्गावर डबलडेकर सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाईल अशी माहिती मध्य रेल्वेचे विभागीय आयुक्त मुकेश निगम यांनी दिली.
रेल्वे मार्गावरील बोगदे,वळणावरचे रूळ,त्यांची वजन वाहून नेण्याची क्षमता,याची चाचणी घेतली जाणार आहे.चाचण्यामध्ये डब्याचे वजन जोखण्यासाठी डब्यांमध्ये दगड मातीने भरलेल्या गोण्या ठेवण्यात येतील त्यामुळं गाडीचे वजन,क्षमता,वेग,आणि रूळाची क्षमता तपासता येणार आहे.