कण रेल्वे मार्गावर मध्य रेल्वेकडून एसी डबलडेकर विशेष प्रिमियम ट्रेन आजपासून सुरू झाली असून लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमाळी दरम्यान धावणाऱ्या या ट्रेनला पहिल्याच दिवशी प्रवाशांकडून चांगलाच प्रतिसाद मिळाल्याचं दिसून आलंय.डबलडेकरचा प्रवास अन्य गाड्यांच्या तुलनेत महाग असला तरी या गाडीचे 28 ऑगस्टपर्यतचे तिकिट फुल्ल झाल्याचे सांगण्यात आले.आज सकाळी ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटल्यानंतर ती सकाळी 9च्या सुमारास रोहा स्थानकात आली मात्र मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वे यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे ही रेल्वे जवळपास पाऊनतास रोह्याजवळ रखडून पडली होती.नंतर ती पुढं रवाना झाली.गपणतीच्या काळात ही रेल्वे 22 फेऱ्या करणार असल्यानं कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर विनाव्यत्यय होईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
गणपतीच्या काळात कोकण रेल्वे मार्गावर अन्य जवळपास 198 अतिरिक्त रेल्वे धावणार असल्याने प्रवाशांची तिकिटासाठी होणारी धावाधाव टळणार आहे