कोकण किनारपट्टीवर सिगलची शिकार वाढली

0
1455

विकास प्रकल्पांच्या नावाखाली किनारपट्टीवरील महाकाय वृक्षांची होणारी कत्तल,तिवरांची तोड आणि वाढते प्रदूषण यामुळे कोकणातील विविध दुर्मिळ पक्षाी अगोदरच इतिहास जमा होत असताना आता कोकणात येणाऱ्या सिगल पक्षांची संख्याही उत्तरोत्तर घटत चालली आहे.
दरवर्षी रायगड,रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हयाच्या विविध भागात मोठ्या प्रमाणात सिगल पक्षी येतात.कोकणातलं आल्हाददायक वातावरण, आणि खाद्याच्या मुबलकतेमुळे प्रजननासाठी हे पक्षी जानेवारी ते एप्रिल या काळात कोकणात येतात.पण यंदा सिगलच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याचं पक्षी निरीक्षकांचे म्हणणे आहे.त्यातच छुप्या पध्दतीनं सिगलची शिकार होऊ लागल्याने पक्षी मित्र चिंता व्यक्त करीत आहेत.काही वर्षांपूर्वी उरणच्या किनाऱ्यावर दोघा शिकाऱ्यांना बंदुकीनं सिगलची शिकार करताना रंगेहात पकडण्यात आलं होतं.असे प्रकार आता सर्राश होत असल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे.या पार्श्वभूमीवर सिगलला शिकाऱ्यांपासून संरक्षण मिळावं अशी मागणी पक्षी मित्र करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here