कोकणातील आपत्तीच्या काळात लष्कर मदतीला

0
1048

कोकणातील आपत्ती निवारण व्यवस्थेत आता भारतीय लष्कराला सामावून घेण्यात येत असून त्यासाठी पुण्याच्या औध येथील मराठा रेजिमेंटच्या एका पथकाने नुकतीच रायगड जिल्हयातील महाड,नागोठणे परिसराला भेट देऊन तेथील परिस्थितीचे सर्वेक्षण केले,आपत्ती निवारणाच्यादृष्टीने एक आराखडाही तयार कऱण्यात आला आहे.ल़ष्कराच्या पथकाने रायगडातील नद्या,डोंगर,खाड्या,दरड कोसळण्याचा धोका असणारी गावे आदिंचा अभ्यास केला आहे.आपत्तीच्या काळात जिल्हयातील खाड्या आणि नदीपात्राचा वापर करून स्पीड बोटीने आपतग्रस्त गावांपर्यत पोहचण्याचे मार्ग या पथकाने नक्की केलेत.2005 च्या आपत्तीत पुण्याहून निघालेले लष्कर कोकणात पोहचायला 72 तास लागले होते,या पार्श्वभूमीवर पाहणी पथकाने कोकणात जाण्यासाठी जवळचे मार्ग नक्की केले आहेत.त्यामुळे यंदाच्या पावसाळय़ात कोणत्याही नैसर्गिक आपत्तीच्या वेळेस केंर्दीय आपत्ती नियोजन यंत्रणा आणि राज्याच्या आपत्ती नियोजन येंत्रणेबरोबरच लष्कराची यंत्रणाही तातडीने आपदग्रस्तांच्या मदतीसाठी कोकणात पोहोचणार आहे,.त्यामुळं कोकणवासियांना नक्कीच दिलासा मिळाला आह

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here