रायगड जिल्हयातील माणगाव,तळा आणि रोहा तालुक्यात येऊ घातलेल्या दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरला विरोध करण्यासाठी येत्या 9 जुलै रोजी मंत्रालयावर भव्य मोर्चा काढण्याचा निर्णय रविवारी माणगाव येथ झालेल्या शेतकऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला.संभाव्य कॉरिडॉरमुळे तीन तालुक्यातील 78 गावातील 67 हजार 500 एकर जमिन संपादित केली जाणार आहे.त्याला शेतकऱ्यांचा विरोध ाआहे.
सरकारने कॉरिडोरसाठी अशा नोंदी सातबाराच्या उताऱ्यावर केल्या असून शेतकरी आपल्या जमिनी देण्यास तयार असल्याचा अपप्रचार सरकारकडून होत आहे.27 हजार हेक्टर जमिनी पैकी केवळ 1380 हेक्टर जमिनीची संमतीपत्र देण्यात आली आहेत.ज्यांनी जमिनीची संमतीपत्रे दिली आहे ते देखील मुळचे भूमीपूत्र नसून कॉरिडोरवर डोळा ठेऊन जमिनी खरेदी केलेले दलाल आहेत.त्यामुळे बहुसंख्य शेतकऱ्यांचा या प्रकल्पास विरोध असल्याचे कॉरिडोर विरोधी शेतकरी संघर्ष समितीच्या नेत्या उल्का महाजन यांनी सांगितले.