माध्यमांना दिलेल्या शिव्या आणि धमक्यांचे परिणाम अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या टीमला भोगावे लागू लागले आहेत.केजरीवाल यांच्या बंगलोर दौऱ्यांबाबतची एक गोष्ट आता समोर आली आहे.केजरीवाल यांची सभा लाईव्ह दाखविण्याचे बहुतेक चॅनेलने टाळले आहे.एबीपी न्यूज आणि हेडलाईन टु डे हे दोन चॅनल सोडले तर केजरीवाल यांना लाइव्ह कोणीही दाखविले नाही.वस्तुतः सर्वच चॅनेलच कॅमेरे कार्यक्रम स्थळी हजर होते.नंतर केजरीवाल याच्या बातम्या दाखविल्या गेल्या असल्यातरी त्यांना लाइव्ह दाखवायचे टाळले आहे.
केजरीवाल यांचा कार्यक्रम सुरू असताना न्यूज-24 वर क्रिकेट,आयबीएन-7 वर होळीचा कार्यक्रम,एनडीटीव्हीवर-टी20 मॅच,इंडिया टीव्हीवर कॉमेडी वीथ कपिल,आजतकवर राहूल गांधी,झीवर होळी,टाइम्स नाऊवर विकेन्ड न्यूज,एनडीटीव्हीवर कॉमेडी शो,सीएनएन -आबीएनवर विविध कार्यक्रम दाखविले जात होते.केजरीवाल यांनी बेगलोरमध्ये वारानसीतून निवडणूक लढविण्याचे सूचित केले तरी तरी त्याला फारशी प्रसिध्दी मिळाली नाही.त्यामुळे केजरीवाल कधी आले आणि गेले हे बंगलोरकरांना कळलेही नाही.
बातमी देणे हे वृत्तपत्रे किवा वाहिन्याचे काम आहे.बातमी ब्लॅक आऊट कऱणे ही आपल्या व्यवसायाशी केली जाणारी प्रतारणा आहे हे जरी खरे असले तरी जेव्हा एखादी व्यक्ती माध्यमांचा आवाज बंद कऱण्याचाच विचार मांडते,माध्यमांना धमक्या देते किंवा कोणी माध्यमांवर हल्ले करीत असतील तर अशा व्यक्तींच्य बातम्या ब्लॅक आऊट कऱणे ही प्रतारणा नाही.पत्रकारांना कोणतेही कायदेशीर संरक्षण नसताना बातम्यांवर बहिष्कार टाकण्याशिवाय पत्रकारांच्या हाती काहीच नसते.