केजरीवांलाचे टार्गेट मिडिया

0
739

आरंभीच्या काळात माध्यमांबद्दल भरभ़रून कौतूकाचे बोल बोलणारे आपचे सर्वेसर्वा अऱविंंद केजरीवाल आता सातत्यानं माध्यमांवर आगपाखड करायला लागले आहेत.काही माध्यमं पैसे घेऊन मोदीसाठी आम्हाला बदनाम करीत आहेत असा आरोप केजरीवाल यांनी आज एका मुलाखतीत केला तर दुसरीकडे कालच्या मुंबई भेटीत जो गोंधळ झाला त्यालाही केजरीवाल यांनी माध्यमांनाच जबाबदार धरले आहे.माध्यमांचा अतिउत्साहामुळे कालचा दौरा पूर्णपणे कोसळला असा आरोप केजरीवाल यांनी केला आहे.

केजरीवाल आता आम राहिले नाहीत ते खास झाले आहेत.हे त्यांना स्वतःलाही माहिती आहे.त्यामुळे ते जेथे जातील तेथे माध्यमं बातमीसाठी त्यांचा पाठपुरावा करणार हे सारं माहिती असतानाही त्यांनी रिक्षातून प्रवास कऱणं,रेल्वेतून जाणं आणि ते ज्या आम आदमीबद्दल गळा काढत असतात त्यांचीच अडचण करणं योग्य आहे काय याचा विचार केजरीवाल पक्षाने करण्याची गरज आहे.रिक्षातून अथवा रेल्वेतून प्रवास करण्यासाठी सर्वसामांन्य माणसाला पोलिसांची परवानगी घ्यावी लागत नाही हे जरी खरे असले तरी सामांन्य माणसामुळे कोंडी होत नाही.ज्याच्यामुळे कोंडी होते त्यांनी आपल्यामुळे जनतेला त्रास होणार नाही हे पाहिले पाहिजे.हे सारं करायचं त्यावर माध्यमांनी टीका केली की,पुन्हा माध्यमांच्या नावाने बोटं मोडायचे हे योग्य नसल्याची भावना व्यक्त होत आहे.
चर्चगेटवरचे स्कॅनर्स माध्यमांच्या रेटारेटीमुळेच पडलेअसे आपने म्हटले आहे.त्यात आमचा काही संबंध नाही.उलट हे स्कॅनर आपच्या कार्यकर्त्यानी व्यवस्थित ठेवले असेही आपने म्हणत माध्यमांना टार्गेट केले आहे.बातमी सत्य असली तरी ती आपल्या विरोधात असली की,सारेच पिसाळतात अरविंद केजरीवाल आणि त्यांचा पक्षही आता त्याला अपवाद राहिलेला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here