पञकाराने रडण्यापेक्षा लेखणीच्या शस्ञाने लढा व बदलत्या सोशल मिडीयावर मात करा- *शुशिल कुलकर्णी*
 
*आदर्श पत्रकार संघाचे पुरस्कार वितरण व पदग्रहण सोहळा संपन्न*
 
केज–
 
समाजातील वाढत चाललेल्या द्वेवशाची आग विझविण्यासाठी पत्रकारांनी आपल्या लेखनातून कार्य करावे, वृत्तपत्राच्या पत्रकारांनी इंटरनेट सोबत मैत्री करून जिवन वेगवान बनवत नवनवीन कल्पना अवगत केल्या पाहिजेत, अडचणी मांडून रडत बसण्यापेक्षा त्या सोडवण्यासाठी संघ,समितीच्या माध्यमातून विचार मांडले जावेत, पत्रकारांनी वार्तांकन बरोबरच विविध व्यवसायात उतरून आपली आर्थिक सुधारणा केली पाहिजे असे शुशिल कुलकर्णी यांनी पत्रकारांना मार्गदर्शन करताना आपले मनोगत व्यक्त केले .
ते केज येथे आदर्श पत्रकार संघाचे पुरस्कार वितरण व नूतन पदाधिकारी पदग्रहण सोहळा दि.१६ मंगळवार रोजी शेतकरी सभागृहात आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. ते पुढे बोलताना म्हणाले की, आपणाला पद, प्रतिष्ठा, सन्मान मिळाला की, हुरळून न जाता अधिक मेहनत घेऊन प्रगती साधली पाहिजे.
यावेळी या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले मराठी पञकार परीषदेचे सरचिटणीस अनिल महाजन यांनी आदर्श पत्रकार समितीचे कौतुक केले तसेच राबविण्यात आलेले विविध उपक्रमांची प्रशंसा करत पुढील वाटचालीसाठी नूतन पदाधिकारी व पुरस्कार विजेत्यांना शुभेच्छा दिल्या.मराठी पञकार परीषद पञकारा साठी विशेषतहा ग्रामीण भागातील पञकाराच्या पाठीशी कशा प्रकारे उभी रहात आहे हे सांगीतले
या कार्यक्रमाला अनिल वाघमारे राज्य अधिस्वीक्तीकृती सदस्य, गुंजकर बीडीओ साहेब हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
 
यावर्षी दिले जाणारे पुरस्कार विजेत्या मध्ये नागनाथ सोनटक्के जीवनगौरव ,प्रा. हनुमंत भोसले आदर्श मुक्तपत्रकार, शुभम खाडे यांला स्व.सुनिल देशमूख निर्भीड पत्रकार, तर शोध पत्रकारिता पुरस्कार हनुमंत सौदागर व दिपक नाईकवाडे यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
 
२०१८ या चालू वर्षासाठी आदर्श पत्रकार संघाच्या नुतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा संपन्न झाला यामध्ये अध्यक्ष म्हणून दै. लोकप्रश्नचे वार्ताहर विजय आरकडे ,संपादक सतीश केजकर सचिव, दशरथ चौरे सहसचिव, दैनिक पार्श्वभूमी प्रतिनिधी धनंजय घोळवे प्रसिद्धी प्रमुख , नंदकुमार मोरे उपाध्यक्ष शहर विभाग, मनोराम पवार उपाध्यक्ष ग्रामीण विभाग, रमेश इतापे कोषाध्यक्ष यांनी पदभार स्वीकारला.
या आयोजित सत्कारसोहळा व पदग्रहण कार्यक्रमाला बजरंग सोनवणे, आदित्य पाटील,राहुल सोनवणे,डाॅ. योगिनी थोरात, हारूनभाई इनामदार, पशुपती दांगट, दत्ता धस, विष्णू घुले, भाई गुंड, सिताताई बनसोड,राहुल सरवदे, शिवाजी हजारे,संतोष देशमुख, डोईफोडे सर,प्रा. हिरवे , मुकुंद गायकवाड, पत्रकार दिपक काका देशपांडे, श्रावणकूमार जाधव, विनोद शिंदे तसेच, सरपंच,डाॅक्टर, वकील , शिक्षक असे विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
आदर्श पत्रकार संघाचे पुरस्कार वितरण व पदग्रहण सोहळा कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. हनुमंत भोसले यांनी करून पत्रकार संघाचे ध्येय ,धोरणे व कार्य उपस्थितासंमोर मांडले. सूत्रसंचालन गौतम बचूटे यांनी केले तर कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर व श्रोते यांचे आभार सतिश केजकर यांनी मानले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आदर्श पत्रकार संघाचे धनंजय देशमुख, अशोक सोनवणे, धनंजय कुलकर्णी,सुहास चिद्ववार संतोष रोकडे, अमोल जाधव, भुजंग इंगोले जय जोगदंड, अक्षय वरपे,दत्ता ढाकणे,अनंत जाधव, इत्यादीने परिश्रम घेतले.
 
*चौकट*
 
स्व सुनिल देशमूख व स्व.मोहन भोसलेचा आदर्श समोर ठेवून पञकारीता करा
— अनिल महाजन
ग्रामीण भागात पञकारीता कशी करावी यांचा आदर्श घ्यायचा असेल तर स्व.सुनिल देशमूख व स्व.मोहन भोसले यांना समोर ठेवून प्रत्येक पञकाराने आपले काम केले पाहीजे .स्व सुनिल देशमूख यांच्या मार्गदर्शना खाली मी घडलो एखादे प्रकरणी हातात घेतले तर तडीस कसे घेऊन गेले पाहीजे यांचा आदर्श उदाहरण ते होते तर स्व मोहन भोसले यांनी जिल्ह्यात दबदबा निर्माण केला होता या पुरस्कारातून त्यांचा आदर्श तरूण पञकारानी समोर ठेवावा व या काळात काम करावे सकारात्मक पध्दतीने काम करावे सामाजीक बांधीलकी ठेवून काम करावे असे प्रतीपादन मराठी पञकार परीषदेचे सरचिटणीस अनिल महाजन यांनी अध्यक्षीय भाषणात बोलताना केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here