अगोदर सुनील केंद्रेकर ,नंतर श्रीकर परदेशी आणि आता चंद्रकांत गु डेवार. प्रामाणिक,कर्तव्यकठोर आणि निस्पृहपणे काम हे अधिकारी राज्यातील कॉग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यात खुपत होते.लोकांचं प्रेम लाभलेले हे अधिकारी नेत्यांची चमचेगिरी करीत नाहीत,त्यांचे आर्थिक हितसंबंध जोपासत नाहीत म्हणून सत्ताधाऱ्यांनी त्यांना बाजुला केलं.लोकांच्या उद्रेकाची पर्वा न करता मनमानी केली.
बीडमध्ये सुनील केंद्रेकरांनी साऱ्या उपटसुभांना सरळ केलं होतं.सामांन्यांना दिलासा मिळेल,सामांन्यांची काम होतील अशी सारी व्यवस्था केली होती.अतिक्रमाणं हटवून रस्त्यांना श्वास घेता येईल अशी स्थिती निर्माण केली होती.गावगन्ना पुढाऱ्यांच्या भ्रष्टाचारावर हातोडा मारला होता.शेवटी व्हायचं तेच झालं.त्यांची बदली केली.लोक चार दिवस रस्त्यावर आले.नंतर सारं थंड पडलं.हे असंच होतं.नेहमी.
श्रीकर परदेशी हे अधिकारीही असेच कर्तव्यदक्ष.मितभाषी पण कणखर बाण्याचे.पिंपरी-चिचवडमध्ये शिस्त आणण्याचा त्यांनीही प्रयत्न केला.बेकायदेशीर अतिक्रमणं,एकाच जागेवर ठिय्या मांडून बसलेले कर्मचारी,बेफामपणे वागणारे नगरसेवक यांना सरळ करून पिंपरी-चिचवड हे आधुनिक शहर करण्याचा त्यांनी चंग बांधला होता.ते देखील हितसंबंध दुखावलेल्या मंडळीना पाहवलं नाही.त्यांना हडविलं गेलं.पुन्हा दोन दिवस गल्ला झाला.मग सारं शातं,शांत..
आता सोलापूर मनपाचे आयुक्त चंद्रकांत गुंडेवार यांची बारी.त्यांनीही सोलापूरात झपाटल्या सारखं काम केलं.एलबीटीची वसुली केली,कर्मचाऱ्यांचे पगार वाढविले,केंद्र सरकारच्या योजनेतुन 200 बसेस आणल्या.सोलापूरचा पाणी प्रश्न कायम स्वरूपी सोडविण्याचा त्याचा प्रयत्न होता.त्यांच्या कामावर सामांन्य सोलापूरकर खूश होते.नगरसेवक मात्र संतप्त होते.काऱण त्यांची ठेकेदारी बंद झाली होती.इ-टेंडरिग सुरू केली होती.त्यामुळं अनेकांच्या दुाकानदाऱ्या बंद झाल्या.हे ते खपवून घेणं शक्य नव्हतं.आमदार प्रणिती शिंंदे यांच्यासमोरच कॉग्रेसचे नगरसेवक त्यांच्या अंगावर गेले.राजीनामा देऊन निघून जा असं त्यांना सांगितलं गेलं.शांत स्वभावाचे गु डेवार तेथून उठले आणि आपल्या खासगी गाडीत बसून सोलापूर सोडून निघून गेले.आता सोलापूरकर जनता रस्त्यावर आलीय. गु डेवार परत या चा त्यांचा आग्रह आहे.हे आंदोलन किती दिवस चालते हे बघायचे.पण मागिल ोदन अनुभव लक्षात घेता सोलापूरकर किती दिवस पेन्शन्स टेवतील सांगता येत नाही.सुशील कुमार शिंंदे हे सोलापूरचे आहेत.त्यांचा आपल्या दिवट्या नगरसेवकांना पाठिंबा आहे की नाही ते समजत नाही पण प्रणिती शिंदे यांच्या समोरच हे सारं झाल्यानं या सर्व घडामोडी मागं काय दडलंय ते वेगळं सांगायला नको.