महाराष्ट्र संपादक परिषदेत मोठे बदल
कृष्णा शेवडीकरांची उचलबांगडी,
संजय मलमे नवे अध्यक्ष
मुंबईः महाराष्ट्र संपादक परिषदेच्या अध्यक्षपदावरून नांदेडच्या श्रमिक एकजूटचे संपादक कृष्णा शेवडीकर यांची अखेर उचलबांगडी करण्यात आली आहे.यशवंत पाध्ये यांच्या निधनानंतर कृष्णा शेवडीकर यांची अध्यक्षपदी वर्णी लागली होती.ही नियुक्ती तीन वर्षासाठी होती.मात्र एक वर्षातच त्यांना अध्यक्षपदावरून पायऊतर व्हावे लागले आहे.त्यांच्या जागी पुण्यनगरीचे संपादक संजय मलमे यांची अध्यक्ष म्हणून एकमताने नियुक्ती कऱण्यात आली आहे.
महाराष्ट्र संपादक परिषदेच्या कार्यकारिणीची बैठक आणि त्यानंतर वार्षिक सर्वसाधारण सभा आज मुंबईत झाली.यावेळी कृष्णा शेवडीकर यांच्यावरील एक गुन्हा सिध्द झाला असून त्या प्रकरणात त्यांना शिक्षाही झाली आहे हे वास्तव बैठकीसमोर आले..त्याबाबतची कागदपत्रे बैठकीत मांडली गेली.प्रकाश पोहरेंवर गुन्हा दाखल झाल्यानंतर या मुद्याावर त्यांचे अध्यक्षपद आणि विनोद कुलकर्णी यांचे सदस्यत्व काढून घेण्यात शेवडीकर आघाडीवर होते.तेच बुमरँग आज त्यांच्यावर उलटले असून तोच मुद्दा पुढे करीत त्याचा सर्वसाधारण सभेत राजीनामा घेतला गेला अशी माहिती हाती आली आहे.शेवडीकर यांची अध्यक्षपदाची कारकीर्द अत्यंत निष्क्रिय ठरली.यशवंत पाध्ये आणि प्रकाश पोहरे यांनी मोठ्या कष्टाने संघटनेला जे वलय निर्माण करून दिले होते ते धुळीला मिळविण्याचे काम शेवडीकर यांनी केले अशी चर्चा सदस्य करीत होते.कार्यकारिणीमधील सदस्यांत लावा-लावी करून संघटनेतील एकजूट मोडीत काढण्याचे काम शेवडीकर यांनी केल्याचा आरोपही त्यांच्यावर होता.अध्यक्ष म्हणून स्वतःची गेली अनेक वर्षे अधिस्वीकृती समितीवर वर्णी लावून घेत असताना अनेक ज्येष्टांना त्यांनी डावलल्याचा रागही त्यांच्यावर होता.त्यामुळं शेवडीकर आणि अन्य एक सदस्य वगळता सर्व सदस्य विरोधात असल्याने त्यांच्यासमोर राजीनामा देण्याशिवाय पर्याय उरला नाही.त्यांनी आपले अध्यक्षपद वाचविण्याचा,’माझे आणखी दोन वर्षे राहिले आहेत मला माझा कार्यकाळ पूर्ण करू द्या’ असा आग्रह धरला मात्र त्यांची कोणतीही मात्रा चालली नाही.अखेर त्याना राजीनामा द्यावा लागला आहे.त्यांच्या जागी पुण्य नगरीचे मुंबईचे संपादक संजय मलमे याची एकमताने नवे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे.नवनिर्वाचित अध्यक्ष संजय मलमे यांचे मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष एस.एम.देशमुख यानी अभिनंदन केले असून त्याना संपूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासन दिले आहे. संघटनेत शेवडीकर गट आता अल्पमतात आला आहे.
————————————————————————————————-
आधीचे वृत्त
नांदेडचे पत्रकार कृष्णा शेवडीकर यांना दंडाची शिक्षा
नांदेडः नांदेड येथून प्रसिध्द होणार्या श्रमिक एकजूट दैनिकाचे मालक ,संपादक तथा राज्य अधिस्वीकृती समितीचे सदस्य कृष्णा शेवडीकर यांना एका प्रकरणात बिलोली येथील सत्र न्यायालयाने तीन लाख रूपयांचा दंड ठोठावला आहे.या घटनेने माध्यम जगतात खळबळ उडाली आहे.
एक व्यावसायिक शेख अब्दुल यांच्या विरोधातल्या एका बातमीत त्यांच्याबद्दल श्रमिक एकजूट्च्या बातमीत भूमाफिया,हरामखोर, दमदाटी,ब्लॅकमेलिंग असे असांसदीय आणि बदनामीकारकर शब्द वापरले गेले होते.यामुळे आपली बदनामी झाल्याची तक्रार शेख अब्दुल यांनी बिलोली न्यायालयात करून शेवडीकर यांच्या विरोधात खटला दाखल केला होता.( विशेष खटला नंबर सी.एम,.नं.01/2012 ) 2012 च्या या खटल्याचा निकाल 22 जून 2016 रोजी लागला असून या प्रकरणात कृष्णा शेवडीकर आणि अन्य एकास न्यायालयाने दोषी ठरविले असून त्यांना तीन लाख रूपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.बातमी निःपक्ष असली पाहिजे अशी अपेक्षा असते.असे असतानाही अत्यंत आक्षेपार्ह शब्द बातमीत वापरल्याने शेख अब्दुल यांची बदनामी झाल्याचे सिध्द झाले असून शेवडीकर यांना तीन लाख रूपये दंड ठोठावण्यात आला आहे.
दरम्यान “ज्या पत्रकारावर गुन्हा दाखल आहे अशा पत्रकाराला अधिस्वीकृती देता कामा नये अशा नियम अधिस्वीकृतीच्या मुळ नियमात आहे.मात्र हा नियम गैरसोयीचा ठरत आहे ,असे दिसल्यानंतर नवा जीआर न काढताच ज्या पत्रकाराला शिक्षा झालेली आहे त्याला अधिस्वीकृती दिली जाऊ नये असा नियम तयार केला गेल .आता कृष्णा शेवडीकर यांच्यावरील गुन्हा सिध्द झाला असून त्यांना दंडाची शिक्षा झालेली आहे त्यामुळे त्यांचे अधिस्वीकृती कार्ड रद्द करावे आणि त्यांची अधिस्वीकृती समितीवरील नियुक्ती रद्द करावी अशी मागणी पुणे येथील ज्येष्ठ पत्रकार तथा सांजवार्ता दैनिकाचे संस्थापक संपादक विनोद कुलकर्णी यांनी मुख्यामंत्र्यांकडे एका पत्राव्दारे केली आहे.या संदर्भात योग्य ती कारवाई झाली नाही तर सप्टेंबर 2016 मध्ये शिर्डी येथे होणार्या अधिस्वीकृती समितीच्या राज्यस्तरीय बैठकीसमोर उपोषण कऱण्याचा इशारा विनोद कुलकर्णी यांनी दिला आहे.आता शेवडीकर यांचे आका कार्ड आणि समिती कशी वाचविली जाते याकडे राज्यातील पत्रकारांचे लक्ष लागले आहे.