अलिबाग-शेती विषयी शास्त्रशुध्द माहिती देणार्या किसान एसएमएस सेवेला रायगड जिल्हयात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असून आतापर्यत तब्बल 75 हजार 147 शेतकर्यांनी त्याचा लाभ घेतला आहे.यात महाड तालुक्यातील सहा हजार पाचशे शेतकर्यांचाही समावेश आहे.आजचे हवामान,पिकांची परिस्थिती,कृषी विभागाच्या नवीन योजना आदि विषयी शेतकर्यांना माहिती मिळावी यासाठी केंद्र सरकारने राज्याच्या कृषी विभागाच्यामतदीनं 2013 मध्ये सुरू केलेली ही योजना रायगडमधील शेतकर्यांसाठी उपयुक्त ठरत असून घरबसल्या मोबाईलवर शेतीची सारी माहिती मिळत असल्याने शेतकर्यांना शेतीचे नियोजन कऱणे शक्य होत आहे.-