समुद्र किनारे सुरक्षित करण्यासाठी सर्वंकष धोरण आखण्याच्या सूचना मुंबई उच्च न्यायालयाने काल सरकारला केल्या आहेत.मुरूड दुर्घठनेच्या पार्श्वभूमीवर एक याचिका दाखल करण्यात आली आहे.किनारा सुरक्षिततेबाबात यापुर्वी न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याची याचिकाकर्त्याची तक्रार आहे.त्यावर सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती अमजद सैय्यद यांच्या खंडपीठाने समुद्र किनारे सुरक्षित असतील तर पर्यटनाला चालना मिळेल अशी टिप्पणी केली.गोव्यातील समुद्र किनार्यावरील सुरक्षा व्यवस्थेची राज्य सरकारने पाहणी करावी असेही न्यायालयाने सूचविले आहे.पर्यटकांना धोक्यांच्या ठिकाणांची माहिती देणे,टेहळणी मनोरे,दिवे ,सुरक्षारक्षकांना जीवरक्षक साहित्य पुरविणे तसेच समुद्रात किती अंतर जावे किती अंतर सुरक्षित आहे याच्या सूचनाही पर्यटकांना मिळाल्या पाहिजेत असे न्यायालयाने सरकारला बजावले आहे.यापुर्वीच्या आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याबद्दल न्यायालाने नाराजी व्यक्त केली आहे.