रविशकुमार यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार का दिला गेला याचंं सविस्तर विवरण मॅगसेसे पुरस्कार देणार्या निवड समितीनं केलंय.रविशकुमार यांच्यातील खास गुणांचा गौरव करताना समिती म्हणते,आपल्या कामाप्रती असलेली त्यांची प्रतिबध्दता,पत्रकारितेसाठी आवश्यक असणारी उच्च दर्जाची नैतिकता,सत्यासोबत कायम उभे राहण्याची हिंमत,सचोटी आणि स्वतंत्र भूमिका घेण्याची तयारी हे रविशकुमार यांच्यातील गुणे कौतूकास्पद असल्याचे समितीचे म्ङणणे आङे.सत्तेला शांतपणे प्रश्न विचारत पत्रकारितेच्या माध्यमातून लोकशाही बळकट करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचा हा सत्कार असल्याचे मॅगसेसेनं म्हटलं आहे.
जे पत्रकार सत्तेच्या मागे-पुढे फिरतात ते पद्म पुरस्कार ‘मिळवितात’..जे पत्रकार जनतेच्या बाजुनं उभं राहतात आणि व्यवस्थेवर कोरडे ओढतात..ते मॅगसेसे पुरस्काराचे धनी ठरतात..रवीशकुमार यांना मिळालेल्या पुरस्कारामुळंं जनहितासाठी सत्तेला अंगावर घेणार्या पत्रकारांची नक्कीच हिंमत वाढली आहे.रवीशजी आम्हाला आपला अभिमान आहे..
आशिया खंडातील नोबल म्हणून ओळखला जाणारा रॅमन मॅगसेसे हा पुरस्कार रविशकुमारला मिळावा ही गोष्ट सत्तेच्या विरोधात चार हात करून लोकशाही बळकट करणार्या पत्रकाराच्या कार्याला मिळालेली पोच पावती आहे.रविशकुमार यांचे मराठी पत्रकार परिषद आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्यावतीने अभिनंदन.