काय असू शकेल कोंकणातल्या नव्या  पक्षाचं नाव ?

0
1907

काय असू शकेल कोंकणातल्या नव्या  पक्षाचं नाव ?

हम,स्वाभिमानी कॉग्रेस सेना,एनटीआर कॉग्रेस की एकला चलो रे मंच

बघा फेसबुक फे्रन्डस् च्या प्रतिभेला कसे घुमारे फुटले आहेत ते…

महाराष्ट्रात आणखी एक नवा पक्ष निघतोय म्हणे..त्याचा मुहूर्तही ठरल्याची चर्चा आहे.मात्र या पक्षाचं नाव काय असेल हे अजून समोर आलेलं नाही…नव्या  पक्षाचं नाव ‘सिंधुदुर्ग जनता पक्ष’ असं तर नक्कीच नसेल.मग काय असू शकेल  या पक्षाचं नाव ?  आम्ही आमच्या फेसबुक मित्रांना हा प्रश्‍न विचारला .अनेकांनी वेगवेगळी नावं सूचविली आहेत..एका झटक्यात बघा किती नावं समोर आलीत ते..

एका मित्रानं केसीपी ( कोकण कॉग्रेस पार्टी ) असं नावं सूचित करून  अखिल महाराष्ट्राचे नेते  आता केवळ  कोकणचे नेतेच होत आहेत असं सूचित   केलं आहे.अन्य एका मित्रानं हमारा अपना विकास पार्टी हे नाव सूचवून  स्वतःच्या आणि मुलांच्या विकासापेक्षा अन्य काही न बघणाऱ्या नेत्याला सणसणीत लगावली आहे .आयाराम गयाराम पार्टी हे आणखी एका मित्रानं सूचविलेलं नाव आहे नव्या पक्षाच्या नेत्याने  दोन-तीन पक्ष बदलले आहेत.ते दाखवून देणारं हे नाव असावं.स्वाभिमान हा या नेत्याचा  आवडता शब्द.दिल्लीश्वरांची  दोन तास वाट पाहून  स्वाभिमानचा अर्थ त्यांनी उलगडून दाखविला असला तरी आमच्या एका मित्राला स्वाभिमानी कोकण पार्टी हे नाव सूचवावं वाटलं आहे.  अगोदर सेना,नंतर कॉग्रेस असा प्रवास झालेल्या या नेत्यांनी दोन्हीकडं मनसोक्त पदं उपभोगली.पक्ष सोडताना दोन्ही पक्षांच्या नेत्यांना येथेच्छ शिव्या-शाप दिले.जनतेला मात्र असं वाटतं की,या दोन्ही पक्षाचां या नेत्याला विसर पडता कामा नये.त्यामुळं नव्या पक्ष्याला स्वाभिमानी कॉग्रेस सेना असं ‘सर्वसमावेशक’  नाव द्यावं अशी सूचना एका मित्रानं केली आहे.

चौकशीचा ससेमिरा मागे लागू नये म्हणून हे नेते  सत्ताधारी पक्षाची जवळीक साधत आहेत अशी चर्चा आहे.त्यावर एका मित्रानं इडी मुक्ती पार्टी हे नाव सूचविलं आहेे एकानं देविघा म्हणजे देश विक्रीची घाई पार्टी असं नाव सांगितलं आहे.आमची होऊ नये आता हार म्हणून आमच्या पक्षाचं नाव प्रहार असं असं असावं असं एका मित्राने म्हटलं आहे.(  पेपरचे  नाव प्रहार आहे हे सर्वांना ज्ञात आहेच ) अन्य एक मित्र  स्वाभिमान  गहान पार्टी हेच नाव योग्य असल्याचं ठणकावून सांगतो. .ना,रा.ज.पार्टी असं नव्या  पक्षाचं नाव ठेवावं अशी सूचना एका मित्रानं केली आहे.एनटीआर कॉग्रेस हे नाव कसं राहिल? असा सवाल एका मित्रानं केला आहे . .नारायण सेना असंही नाव सूचविण्यात आलं आहे.अखिल सिंधुदुर्ग विकास पार्टी असं नाव देण्याचं एकानं सूचित केलं आहे.एकानं गुत्तेदार,ठेकेदार विकास पार्टी असंही नाव सूचविलं आहे.,एका  मित्राला आपच्या धर्तीवर हम हे नाव यथार्थ वाटते.एकला चलो रे हेच नाव नव्या पक्षाला योग्य राहिल असे  एक मित्र म्हणतो.

इतरही काही नावं समोर आली आहेत.प्रत्यक्षात  कोणतं नव निर्माण होतंय  हे दोन-तीन दिवसात दिसणार आहे.पण आमच्या मित्रांनी नेत्याच्या  स्वभावानुसार त्यांच्या पक्षाची नावं सूचविली आहे.मित्रांच्या कल्पनाशक्तीला नक्कीच दाद दिली पाहिजे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here