सांगली ः प्रतिनिधी
पत्रकारांवर झालेले 75 टक्के ह‘े हे राजकीय लोकांकडुन झालेले आहेत. त्यामुळेच पत्रकार संरक्षण कायदा लागू झाला तर आपणच अधिक अडचणीत येऊ अशी भिती राजकीय लोकांना आहे. म्हणुनच राजकीय मंडळीच पत्रकार संरक्षण कायद्यास टाळाटाळ करीत आहेत असा आरोप पत्रकार ह‘ा विरोधी कृती समितीचे निमंत्रक व मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष एस.एम. देशमुख यांनी व्यक्त केले. पत्रकार संरक्षण कायदा व पत्रकारांना पेन्शन मिळालीच पाहीजे या विषयावर सांगलीत आयोजित पत्रकारांच्या निर्धार मेळाव्यात श्री देशमुख बोलत होते.
सांगलीतील शेकडो पत्रकारांच्या उपस्थितीत काल श्री देशमुख यांनी पत्रकार संरक्षण कायदा व पत्रकार पेन्शन यावर मार्गदर्शन केले. सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष जालिंदर हुलवान यांनी स्वागत तर अधिस्विकृती समिती प्रतिनिधी शिवराज काटकर यांनी प्रास्ताविक केले. वरिष्ठ पत्रकार शेखर जोशी यांच्यासह पदाधिकार्यांच्या हस्ते एस.एम.देशमुख यांना सांगलीकरांच्यावतीने मानपत्र देऊन गौरवण्यात आले.
शहरी भागासह ग‘ामिण भागात पत्रकारांवर प्रचंड दादागिरी सुरू आहे. पत्रकारांना दमदाटी करणे, पत्रकारांवर जीवघेणे ह‘े करणे, खोटे गुन्हे दाखल करून मानसिक त्रास देण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळेच सर्वांनी एकत्रीत येऊन पत्रकार संरक्षण कायद्याचा भक्कमपणे लढा उभारला पाहीजे. तसे झाले तर पत्रकार संक्षरण कायदा होण्यास विलंब लागणार नाही, असा विश्वास श्री देशमुख यांनी व्यक्त केला. ेगेल्या दहा वर्षात 850 हुन अधिक ह‘े पत्रकारांवर झाले. आता हे प्रमाण वाढले असुन गेल्या आठ महीन्यातच तब्बल 64 पत्रकारांवर ह‘े झाले आहेत. या पैकी 75 टक्के हल्ले राजकीय लोकांनी, 15 टक्के पोलिसांनी तर इतर वाळू माफिया व गुंडाकडुन झाले आहेत. प्रसार माध्यमांच्या 53 हुन अधिक कार्यालयांवर ह‘े झाले आहेत. गेल्या 8 महीन्यात 34 हुन अधिक खोटे गुन्हे पत्रकारांवर दाखल झाले आहेत. त्यामुळे हा कायदा झाला तर सर्व प्रथम वचक राजकीय मंडळींना बसणार आहे. वर्षात कायदा करतो म्हणणारे भाजपचे नेते सत्ता येऊन दोन वर्षे होऊन गेली तरीही शांतच आहेत, असा आरोप श्री देशमुख यांनी केला.
देशात 16 हुन अधिक राज्यात राज्य सरकार पत्रकारांना पेन्शन देते. महाराष्ट्रच त्यामध्ये मागे आहे. यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र तत्पूर्वी राज्य किंवा जिल्हा पातळींवर ट्रस्टच्या माध्यमातुन निधी उभारून पत्रकारांना पेन्शन देता येईल का याचा प्रयत्न सुरू असल्याचे श्री देशमुख यांनी सांगितले. 2 आक्टोंबरला शहर व जिल्ह्यातील सर्वच पत्रकारांनी एकत्र येऊन राज्यात सर्वात मोठं आंदोलन सांगलीत केले. प्रचंड सं‘येने मोर्चा काढला. स्वच्छता अभियान राबवले याबद्दल जिल्ह्यातील सर्वच पत्रकारांचे श्री देशमुख यांनी यावेळी विशेष आभार मानले. कार्यक‘मास विविध वृत्तपत्रांचे प्रमुख पत्रकार, जिल्ह्यातील बहुतांश वार्ताहर – पत्रकार, वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी, साप्ताहिकांचे संपादक मोठ्या सं‘येने उपस्थित होते. शैलेश पेठकर यांनी आभार मानले.
सांगली जिल्हा परिषदेचा आदर्श राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी घ्यावा
पत्रकार संरक्षण कायदा लागू करा, पत्रकारांना पेन्शन द्या या मागणीचा ठराव सर्वसाधारण सभेत राज्यात पहील्यांदा करणार्या सांगली जिल्हा परिषदेचे श्री देशमुख कौतुक केले. सांगली जि.प.चा हा आदर्श घेऊन राज्यातील सर्वच नगरपालिका, जिल्हा परिषदा व महापालिकांमध्ये असे ठराव करून पत्रकारांना पाठबळ द्यावे असे आवाहन श्री देशमुख यांनी यावेळी बोलताना केले. सांगली जिल्हा परिषद सभेत ठराव मांडणार्या सदस्या छायाताई खरमाटे, तो मंजुर करणार्या जि.प. अध्यक्षा स्नेहल पाटील, उपाध्यक्ष रणजित पाटील यांच्यासह सदस्यांचे आभारही मानले.